Photo Credit; instagram

यूरिक Acid वाढलं की होतो प्रचंड त्रास, 'यापासून' दूर राहिल्यावर मिळतो आराम!

Photo Credit; instagram

शरीरातील प्यूरिन तुटल्याने यूरिक अॅसिडची निर्मिती होते. हे असिड रक्तात मिसळून किडनीच्या मार्फत यूरिनद्वारे बाहेर पडतं.

Photo Credit; instagram

शरीरात प्यूरिनचं प्रमाण वाढल्यास किडनी ते योग्यरित्या बाहेर काढू शकत नाही आणि त्यामुळे शरीरात यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढतं.

Photo Credit; instagram

यूरिक अॅसिड वाढल्याने बऱ्याच समस्या होतात. अशातच यूरिक अॅसिडच्या रुग्णांनी काही पदार्थांचं सेवन करणं थांबवलं पाहिजे.

Photo Credit; instagram

डॉक्टरांच्या मते, बीफ, मटण आणि पोर्क सारख्या लाल मांसमध्ये प्यूरिनचं प्रमाण जास्त असतं. यांचं सेवन केल्याने शरीरातील यूरिक अॅसिडची पातळी वाढू शकते.

Photo Credit; instagram

बिअरमध्ये सुद्धा प्यूरिन जास्त प्रमाणात आढळतं. त्यामुळे अल्कोहोलच्या सेवनाने लिव्हर वर परिणाम होऊन यूरिक अॅसिड बाहेर पडण्याची प्रक्रिया मंद होऊ शकते. यामुळे शरीरात यूरिक अॅसिड जमतं.

Photo Credit; instagram

डाळी जरी पौष्टिक असल्या तरी चणे, राजमा, मटार आणि मसूरमध्ये प्यूरिनचं प्रमाण जास्त आढळतं. यूरिक अॅसिडच्या रुग्णांनी मर्यादित प्रमाणात यांचं सेवन करायला हवं.

Photo Credit; instagram

कोल्ड ड्रिंक्स, पॅक्ट ज्यूस आणि अधिक साखर असलेल्या पदार्थांमध्ये फ्रॅक्टोज असतं. हे यूरिक अॅसिड वाढण्यासाठी कारणीभूत ठरतं. त्यामुळे अशा पदार्थांपासून दूर राहिलं पाहिजे.

पुढील वेब स्टोरी

सकाळी उठल्यानंतर किती पाणी प्यावं?

इथे क्लिक करा