Photo Credit; instagram

भेंडीच्या भाजीसोबत चुकूनही खाऊ नका 5 पदार्थ, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होईल!

Photo Credit; instagram

भेंडी एक चविष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेली भाजी आहे. मात्र, काही पदार्थांसोबत भेंडीचं सेवन केल्यानं आरोग्याला नुकसान पोहचू शकतं. कोणत्या पदार्थांसोबत भेंडीचं सेवन घातक ठरू शकतं, जाणून घ्या.

Photo Credit; instagram

भेंडीमध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर्स भरपूर प्रमाणात असतात.

Photo Credit; instagram

भेंडीमध्ये ऑक्सलेटचं अधिक प्रमाण आढळतं. दुधासोबत भेंडी खाल्ल्याने त्यामधील कॅल्शियमसोबत ऑक्सलेट मिळून किडनी स्टोनचा धोका उद्भवू शकतो.

Photo Credit; instagram

भेंडीमध्ये फायबर्स आणि बटाट्यामध्ये हाय कार्बोहायड्रेट्स आढळतात. दोन्ही एकत्र खाल्याने रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते आणि लठ्ठपणाला कारणीभूत ठरू शकते.

Photo Credit; instagram

भेंडीसोबत आंबट दही खाल्ल्याने पोषक तत्त्वांवर विपरित परिणाम होतात आणि पचनामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात.

Photo Credit; instagram

कारल्याचा गुणधर्म गरम असतो आणि भेंडी थंड असते. दोन्ही पदार्थांचं एकत्र सेवन केल्यानं पोटदुखी, गॅस आणि पचनासंबंधी समस्या उद्भवू शकते.

Photo Credit; instagram

भेंडी आणि मुळ्याचा गुणधर्म वेगवेगळा असतो. एकत्र सेवन केल्याने पचनक्रियेत समस्या होऊ शकते. तसेच गॅस, असिडिटी सारख्या समस्या देखील होऊ शकतात.

Photo Credit; instagram

हल्क्या मसाल्यांसोबत आणि आंबट नसलेल्या पदार्थांसोबत भेंडीचं सेवन करा. असं केल्याने शरीराला योग्य प्रमाण पोषक तत्त्वं मिळतात.

Photo Credit; instagram

भेंडीसोबत अशा पदार्थांचं फूड कॉम्बिनेशन केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या ओढवू शकतात. त्यामुळे अशा पदार्थांसोबत भेंडीचं सेवन करणं टाळा आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. 

पुढील वेब स्टोरी

बकरीचं दूध घेतलं की डेंग्यू बरा होतो?

इथे क्लिक करा