डेंग्यूच्या तापावर लोक बऱ्याचदा घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न करतात. शरीतातील प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी लोक बकरीचं दुध पितात. पण खरंच बकरीच्या दुधाने डेंग्यूच्या आजारापासून आराम मिळतो?
Photo Credit; instagram
डेंग्यू एक व्हायरल इन्फेक्शन असून ते डास चावल्याने होतं. या आजाराच्या लक्षणांमध्ये ताप, अंगदुखी आणि प्लेटलेट्सची कमतरता यांचा समावेश होतो. यावर योग्य उपचार न झाल्याने गंभीर परिणाम होऊ शकतात.
Photo Credit; instagram
बऱ्याच लोकांच्या मते, बकरीच्या दुधात शरीरातील प्लेटलेट्स वाढवणारे पोषक तत्त्वं आढळतात. त्यामुळे डेंग्यूचे रुग्ण या दुधाचं सेवन करतात.
Photo Credit; instagram
मेडिकल रिसर्चनुसार, खरंच बकरीचं दुध प्लेटलेट्सची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं का? याबद्दल अद्याप काही स्पष्ट सांगितलं गेलं नाही.
Photo Credit; instagram
काही स्टडी आणि केस रिपोर्ट्सनुसार, बकरीचं दुध शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही प्रमाणात परिणामकारक ठरू शकतं. मात्र, प्रत्येक रुग्णाला चांगलाच परिणाम मिळेल, असं नाही.
Photo Credit; instagram
कच्च्या बकरीच्या दुधात इन्फेक्शनला कारणीभूत ठरणारे काही बॅक्टेरिया आढळतात. अशा दुधाचं सेवन केल्यानं ब्रुसेलोसिस नावाचा आजार जडू शकतो.
Photo Credit; instagram
बकरीच्या दुधाला डेंग्यूवरचा उपचार मानू नये, असा सल्ला बरेच विशेषज्ञ देतात. बकरीचं दुध उकळून पिण्याचा देखील सल्ला देण्यात आला आहे.
Photo Credit; instagram
डेंग्यूच्या आजारात शरीराला अधिक पाणी, फळे, नारळ पाणी आणि संतुलित आहाराची आवश्यकता असते. यांचं सेवन करणं सुरक्षित आणि प्रभावी मानलं जातं.
Photo Credit; instagram
डेंग्यूच्या आजारासाठी योग्य मेडिकल उपचाराची गरज असते. अशात, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बकरीच्या दुधाचं सेवन करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कांदा खाऊन कमी होईल पोटाची चरबी, हा प्रयोग करून तर पाहा!