Photo Credit; instagram

कांदा खाऊन कमी होईल पोटाची चरबी, हा प्रयोग करून तर पाहा!

Photo Credit; instagram

आजकाल बरेचजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. लोक शरीराच्या चरबीपासून सुटका मिळवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट फॉलो करण्यास सुरुवात करतात.

Photo Credit; instagram

आपल्या आहारात काही बदल करुन शरीराची अतिरिक्त चरबी कमी करता येऊ शकते. खरंतर कांद्यामध्ये वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असलेले बरेच पोषक घटक आढळतात.

Photo Credit; instagram

कांद्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असून त्यात फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. या घटकामुळे ओव्हरइटिंगला आळा घालता येतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

यासोबतच कांद्यामध्ये सल्फर, क्वेरसेटिन सारखे अँटीऑक्सीडेंट्स असतात. हे घटक मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होऊन वजन नियंत्रणात राहतं.

Photo Credit; instagram

कांद्यामध्ये क्रोमियम सुद्धा आढळतं. हे मिनरल रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. शूगर क्रेव्हिंग्स कमी झाल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी कमी होते.

Photo Credit; instagram

कांद्यामध्ये शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असलेलं पोटॅशियम देखील आढळतं. यामुळे वॉटर रिटेंशनची समस्या दूर होऊन वजन कमी करण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

शरीरातील विषारी आणि घातक पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी कांदा फायदेशीर ठरतो. यामध्ये सल्फरचे मोलेक्यूल्स आढळतात. हा घटक शरीरातील डिटॉक्स एजंट प्रमाणे काम करतो. पचनक्रिया सुरळीत होऊन वेट लॉससाठी मदत होते.

Photo Credit; instagram

तुम्ही सॅलडमध्ये कांद्याचा समावेश करु शकता. याव्यरिक्त, कांदा स्टिर फ्राय करुन फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थांसोबत त्याचं सेवन करु शकता. याशिवाय, कांद्याच्या अर्कापासून हर्बल टी बनवून त्यांचं सेवन करणं अधिक फायदेशीर ठरतं. 

पुढील वेब स्टोरी

रात्री झोपण्याआधी फक्त एक वेलची खा; फायदे माहितीयेत?

इथे क्लिक करा