वेट लॉस करताना 'या' चुका... कधीच कमी होणार नाही वजन
Photo Credit; instagram
बरेचजण वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असल्याचं आपण पाहतो. मात्र, अनेकदा बऱ्याच प्रयत्नानंतर सुद्धा त्यांच्या वजनात काहीच फरक जाणवत नाही.
Photo Credit; instagram
हेल्दी डाएट फॉलो करुनही जर वजन कमी होत नसेल तर वजन कमी करताना तुमच्या 'या' चूका यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
Photo Credit; instagram
बऱ्याचदा हेल्दी समजून काही पदार्थांचं सेवन केल्याने त्या पदार्थांमुळे वजन कमी करण्यात अडथळा येऊ शकतात.
Photo Credit; instagram
फिटनेस कोचने याबद्दल सांगितले की अनेकदा महिला वेट लॉस करताना काही चूका करतात ज्यामुळे त्यांचं वजन कमी होत नाही. अशा '5' चुकांविषयी जाणून घ्या.
Photo Credit; instagram
वजन कमी करण्यासाठी महिला खाणं विशेषत: नाश्ता करणं सोडतात. यामुळे तुमचं मेटाबॉलिजम कमी होऊन नंतर जास्त खाण्याची इच्छा होते. त्यामुळे दिवसाची सुरुवात हेल्दी आणि बॅलेन्स्ड ब्रेकफास्टने करा.
Photo Credit; instagram
बऱ्याचदा लो फॅट किंवा डाएट प्रोडक्ट्समध्ये काही प्रमाणात साखर आणि केमिकल्स असतात, जे वजन कमी करण्याऐवजी वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे प्रोसेस्ड फूडचं सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा.
Photo Credit; instagram
अॅव्होकाडो, ड्रायफ्रूट्स आणि ऑलिव्ह ऑइलसारखे हेल्दी फॅट्स जरी फायदेशीर असले तरी यांचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने कॅलरीज वाढू शकतात. त्यामुळे यांचं सेवन मर्यादित प्रमाणात करा.
Photo Credit; instagram
ज्यूस, स्मूदी आणि काही हेल्दी ड्रिंक्समध्ये अधिक प्रमाणात साखर असते. या पदार्थांऐवजी ग्रीन टी किंवा कॉफी उत्तम पर्याय ठरू शकतात.
Photo Credit; instagram
प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांचं सेवन केल्यानं तुमचं पोट अधिक काळ भरलेलं वाटतं आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे तुमच्या आहारात प्रोटीन आणि फायबर असलेल्या पदार्थांचं सेवन करा.