आपल्यापैकी बऱ्याचजणांना सोडा किंवा वेगवेगळ्या फळांचा ज्यूस प्यायला आवडतं.
Photo Credit; canva
मात्र, अधिक गोड पेय घेतल्याने मधुमेह म्हणजेच डायबिटीज होण्याचा धोका वाढतो. तसेच, असं केल्याने डायबिटीज असलेल्या व्यक्तींची प्रकृती गंभीर होऊ शकते.
Photo Credit; canva
गोड ड्रिंक्स घेतल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचं नव्या रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.
Photo Credit; canva
अमेरिकेतील ब्रिघम यंग यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी हा रिसर्च केला आहे. त्यांनी जगातील वेगवेगळ्या भागातील 5 लाखांहून अधिक व्यक्तींची आरोग्याबद्दल माहिती तपासली.
Photo Credit; canva
रिसर्चनुसार, जर एखादी व्यक्ती दररोज केवळ एक 350 मिली गोड ड्रिंक (कोल्ड ड्रिंक, एनर्जी ड्रिंक किंवा स्पोर्ट्स ड्रिंक) घेत असेल, तर व्यक्तीमध्ये डायबिटीजचा धोका 25 टक्क्यांनी वाढू शकतो.
Photo Credit; canva
जर तुम्ही दररोज 250 मिली फळांचा ज्यूस (फ्रूट्स ज्यूस किंवा पॅकेटमधील ज्यूस) अधिक प्रमाणात प्यायल्याने डायबिटीजचा धोका 5 टक्क्यांनी वाढू शकतो.
Photo Credit; canva
या संशोधनाच्या प्रमुख करेन डेला कोर्टे यांच्यानुसार, सोडा किंवा फ्रूट ज्यूससारखे ड्रिंक्स अधिक प्रमाणात घेतल्याने शरीराला नुकसान पोहचू शकतं.
Photo Credit; canva
त्यामुळे गोड पेय पिण्याऐवजी तुम्ही तीच साखर अन्नाच्या स्वरूपात घेऊ शकता. जर तुम्ही अशाप्रकारे साखरेचं सेवन केलं तर डायबिटीजचा धोका कमी होऊ शकतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रात्री नीट झोप येत नाही? 'हे' पदार्थ ठरतील फायद्याचे...