रात्री नीट झोप येत नाही? 'हे' पदार्थ ठरतील फायद्याचे...
Photo Credit; instagram
चांगली आणि पुरेशा झोप आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मात्र बऱ्याचशा लोकांना रात्री झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.
Photo Credit; instagram
आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत, ज्यांचं सेवन केल्याने तुम्हाला रात्री चांगली आणि झोप लागण्यास मदत होईल.
Photo Credit; instagram
चेरी टोमॅटो हे मेलाटोनिन हॉर्मोनचा नैसर्गिक स्रोत आहेत. हे हॉर्मोन सर्केडियन रिदम नियंत्रित करते. झोपण्याआधी चेरी टोमॅटोचा रस किंवा सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
केळीमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले पॉटेशियम आढळते. त्यामुळे केळ्यांचं सेवन केल्याने स्नायूंना आराम मिळण्यास आणि चांगली झोप येण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
अक्रोड हे मेलाटोनिन आणि मॅग्नेशियमचे चांगले स्रोत आहे. हे घटक सुद्धा शरीराला चांगली विश्रांती देण्यास आणि व्यवस्थित झोप मिळण्यासाठी फायदेशीर असतात.
Photo Credit; instagram
बादामात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असते. हा घटक झोप नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतो. बादामात हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन असतात, ज्यामुळे पोट सकाळपर्यंत भरलेले वाटते.
Photo Credit; instagram
ओटमील एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असून ते शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढवण्यासाठी मदतशीर असतात. हे फायबरचे सुद्धा उत्तम स्त्रोत असून पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी मदत करतात.
Photo Credit; instagram
फॅटी फिशमध्ये व्हिटॅमिन B6 असतं. हे व्हिटॅमिन झोपेचं पॅटर्न रेगुलेट करण्यासाठी मदतशीर असतं.
Photo Credit; instagram
कीवीमध्ये भरपूर प्रमाणात सेरोटोनिन असतं. हे झोप नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त असलेलं न्यूरोट्रान्समीटर आहे. झोपण्याच्या आधी कीवी खाल्ल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
जिमला न जाता तब्बल 35 किलो वजन कमी! 'हे' 6 सॅलड ठरले फायद्याचे