Photo Credit; instagram

जिमला न जाता तब्बल 35 किलो वजन कमी! फक्त 'हे' 6 सॅलड ठरले फायद्याचे

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी नेहमी महागडं डाएट आणि जिमला जाण्याची गरज नसते. जितीन नावाच्या एका व्यक्तीने आपल्या घरीच नैसर्गिक पद्धतीने चक्क 35 किलो वजन कमी केलं आहे.

Photo Credit; instagram

जितीनच्या वेट लॉस आणि हेल्दी डाएटचं रहस्य व्हेजिटेरियन सॅलड आहे. या 6 प्रकारच्या सॅलडमुळे त्यांना फ्लॅट बेली आणि ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी मदत झाली.

Photo Credit; instagram

या 6 प्रकारच्या सॅलड बद्दल जाणून घ्या, ज्यांच्या साहाय्याने जितीनला अगदी सोप्या पद्धतीने वेट लॉस करण्यासाठी मदत मिळाली.

Photo Credit; instagram

बीट रक्त शुद्ध करतं आणि संत्र्यामध्ये व्हिटॅमिन C असल्यामुळे ते ग्लोइंग त्वचेसाठी फायदेशीर असतं. हे सॅलड बनवण्यासाठी बीट उकडून ते कापून घ्या. यानंतर संत्र्यांचे तुकडे करून पुदीन्यासोबतलिंबू आणि काळी मिरी टाकून एकत्र मिसळून त्याचं सॅलड बनवा.

Photo Credit; instagram

कैरीमध्ये व्हिटॅमिन C असून ते कोलेजन वाढीसाठी फायदेशीर ठरतं. तसेच मूग त्वचा नितळ करतात. याचं सॅलड बनवण्यासाठी कच्च्या कैरीसोबत मोड आलेले मूग, खोबरं, हिरवी मिरची, मीठ आणि जिरा पावडर मिसळून खोबरेल तेलाची फोडणी द्या.

Photo Credit; instagram

गाजर, काकडी, डाळींब, लिंबू, काळं मीठ आणि कोथिंबीर एकत्र करून सॅलड बनवा. हे सॅलड शरीर हायड्रेटेड ठेवतं आणि त्वचेसाठी फायदेशीर असलेले व्हिटॅमिन C आणि अँटी-ऑक्सीडेंट्स देतं.

Photo Credit; instagram

उकडलेले चणे, कांदा, टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर एकत्र मिसळून त्यावर पुदीना टाकून सॅलड बनवा. या सॅलडमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असून त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर मानलं गेलं आहे.

Photo Credit; instagram

अॅव्होकाडो आणि आळशीच्या बियांमध्ये त्वचेला पोषण देणारे हेल्दी फॅट्स असतात. अॅव्होकाडो आणि काकडी चिरून ते भाजलेल्या आळशीच्या बियांसोबत मिसळून घ्या. यानंतर त्यात ऑलिव्ह ऑइल, लिंबू आणि मीठ घाला.

Photo Credit; instagram

पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह तसेच सफरचंदात मुबलक प्रमाणात फायबर आणि अक्रोडमध्ये ओमेगा-3 आढळतं. हे घटक त्वचा रिपेअर करण्यासाठी फायदेशीर असतात. यासाठी पालक हल्कं उकडून घेऊन सफरचंद आणि अक्रोडसोबत एकत्र करा. नंतर ऑलिव्ह ऑइल, लिंबू आणि मध टाकून खा.

पुढील वेब स्टोरी

सकाळी प्या फक्त 'या' बियांचं पाणी; मेणासारखी वितळेल चरबी

इथे क्लिक करा