Photo Credit; instagram

डाएट आणि व्यायाम करूनसुद्धा वजन कमी होत नाही? आत्ताच बदला ‘या’ सवयी

Photo Credit; instagram

आजकालच्या लाइफस्टाइलमुळे लठ्ठपणाच्या समस्येने बरेच लोक त्रासलेले असल्याचं पाहायला मिळतं.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि हेल्दी डाएट करुनसुद्धा बऱ्याचदा हवा तसा परिणाम मिळत नाही.

Photo Credit; instagram

आपल्या जीवनशैलीतील काही सवयी यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अशा सवयींबद्दल जाणून घ्या.

Photo Credit; instagram

रात्री उशीरा जेवण्याची सवय बदला. झोपण्याच्या कमीत कमी 2 ते 3 आधी तास जेवण करा. यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन कॅलरीज बर्न होतात.

Photo Credit; instagram

झोपेच्या कमतरतेमुळे जास्त भूक लागते आणि मेटाबॉलिजम मंदावते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी 7 ते 8 तासांची पुरेशी झोप आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

बरेच लोक रात्रीच्या जेवणानंतर कोल्ड ड्रिंक किंवा ज्यूस पितात. यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा होतात आणि वजन वाढतं. त्याऐवजी पुरेशा प्रमाणात पाणी प्या.

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी रात्री जास्त तळलेले पदार्थ आणि हेव्ही जेवण करणं टाळा. यामध्ये जास्त कॅलरीज असल्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे पचायला सोपे असलेले हल्के पदार्थ खा.

Photo Credit; instagram

जास्त तणाव म्हणजेच स्ट्रेस आरोग्यासाठी नुकसानदायक असतं. तणावामुळे वाढलेल्या कोर्टिसोलमुळे भूक वाढते आणि फॅटी शूगर असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे झोपण्याआधी डीप ब्रीदिंग किंवा मेडिटेशन करा.

पुढील वेब स्टोरी

श्वेता तिवारीच्या ब्लाउजचे डिझाइन्स; नव्या नवरीसाठी एकदम परफेक्ट

इथे क्लिक करा