साबुदाण्यामध्ये खूपच कमी प्रमाणात फॅट असते. यामध्ये शरीराला ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात.
Photo Credit; canva
यामध्ये फायबरचे प्रमाण कमी असून याच्या सेवनाने पोट अधिक काळ भरल्यासारखं वाटतं. विशेषत: मुगाच्या डाळीसोबत किंवा भाज्यांसोबत याचं सेवन केल्याने अधिक फायदा होतो.
Photo Credit; canva
साबुदाणा हल्का असल्याने तो लवकर पचतो. त्यामुळे याचा लो-कॅलरी डाएटमध्ये समावेश अधिक फायदेशीर ठरतो.
Photo Credit; canva
साबुदाणा फक्त उपावासासाठीच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी देखील चांगला पर्याय ठरू शकतो. साबुदाण्याचे बनवलेले पदार्थ शरीराला ऊर्जा देण्यासोबत भूकसुद्धा नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
Photo Credit; canva
कमी तूपात बनवलेल्या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये भरपूर प्रमाणात भाज्या मिसळा. यामध्ये शेंगदाणे आणि बटाट्याचे प्रमाण मर्यादेत ठेवा.
Photo Credit; canva
हिरव्या भाज्या आणि थोड्या प्रमाणात मसाले वापरून साबुदाण्याची टिक्की किंवा उपमा बनवा. याला डीप फ्राय करण्याऐवजी तव्यावर हल्कं फ्राय करून घ्या.
Photo Credit; canva
रात्रभर भिजवलेले साबुदाणे सकाळी लिंबू पाणी किंवा ताकात मिसळून पिऊ शकता. यामुळे पोट थंड राहण्यास मदत मिळते आणि भूक देखील नियंत्रणात राहते.
Photo Credit; canva
साबुदाण्यामध्ये जास्त प्रमाणात कार्ब्स असल्यामुळे त्याचं अधिक सेवन करू नका. नेहमी प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांसोबत साबुदाण्याचं सेवन करा. यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होईल. तूपात किंवा तेलात तळलेल्या पदार्थांसोबत साबुदाण्याचं सेवन करणं टाळा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
लक्ष्मीच असतात 'या मुलांकाच्या पोरी! घरात पडतो पैशांचा पाऊस, उंबरठ्यापासूनच..