सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करत असल्याचं पाहायला मिळतं. एकदा वजन वाढल्यानंतर ते कमी करणं अगदी कठीण होऊन बसतं.
Photo Credit; instagram
हेल्दी डाएट आणि नियमित व्यायाम करुन सुद्धा वजन कमी होत नाही. रात्रीच्या जेवणातील पदार्थ याला कारणीभूत ठरू शकतात.
Photo Credit; instagram
रात्रीच्या जेवणामुळे वजन वाढतं, असं बऱ्याचजणांना वाटतं. त्यामुळे ते रात्रीचं जेवण स्किप करतात किंवा अगदीच कमी खातात.
Photo Credit; instagram
खरंतर, रात्रीच्या जेवणात हल्के आणि प्रोटीनयुक्त पदार्थ योग्य वेळेत खाल्ल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते. वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा? याबद्दल जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
ग्रीक योगर्टमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असून त्यामध्ये कमी कॅलरीज असतात, त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी हा चांगला पर्याय ठरु शकतो. हे रात्री खाल्ल्याने चांगली झोप येते आणि मेटाबॉलिजम सुद्धा सुधारते.
Photo Credit; instagram
बदामातील पोषक घटक वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये असलेल्या हेल्दी फॅट्स, फायबर आणि प्रोटीनमुळे पोट अधिक काळ भरलेलं जाणवतं. सॅलडमध्ये यांचा समावेश करु शकता.
Photo Credit; instagram
पनीरमध्ये जास्त प्रोटीन असून कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे पोट अधिक काळ भरलेलं वाटतं आणि रात्री उशीरा खाण्याची इच्छा होत नाही. साधी भाजी किंवा सॅन्डविच म्हणून यांचं सेवन करु शकता.
Photo Credit; instagram
डिनरसाठी सूप उत्तम पर्याय ठरतो. रात्री सूप प्यायल्याने पोट अधिक काळ भरलेलं वाटतं, पचनक्रिया सुरळीत होते आणि चांगली झोप लागते.
Photo Credit; instagram
डिनरमध्ये डाळींचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. हे पचनासाठी हल्कं असून यांच्या सेवनाने वजन कमी होऊ शकतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
आता चिंता करा मिनिटांत दूर; प्रेमानंद महाराजांनी सांगितला 'हा' उपाय