सकाळी रिकाम्यापोटी खा 'हे' 6 पदार्थ; काय आहे फायदे? वाचा...
Photo Credit; instagram
आपली ओव्हरऑल हेल्थ चांगली राहण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी काही पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं.
Photo Credit; instagram
अशा पदार्थांचं सेवन केल्यानं पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत मिळतेच पण त्यासोबत निरोगी त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
सकाळी लवकर उठून हे कोमट पाणी आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. ते पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि दिवसाची ताजीतवानी सुरुवात होते.
Photo Credit; instagram
आलं पचनक्रिया सुरळीत करून पोटातील जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. गरम पाण्यात लिंबासोबत आलं मिसळून त्याचं सेवन केल्याने अधिक फायदे मिळतात.
Photo Credit; instagram
आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन C आढळते. हे शरीरातील मेटाबॉजिम वाढवून रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. केस आणि त्वचेसाठी देखील आवळा खूप फायदेशीर मानला जातो.
Photo Credit; instagram
सकाळची सुरुवात ग्रीन टीने करा. रिकाम्या पोटी ग्रीन टी घेतल्यास शरीर हल्कं जाणवतं आणि शरीराला भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट्स मिळतात.
Photo Credit; instagram
सकाळी उठल्यानंतर, कोमट पाण्यात काही थेंब मध घालून प्या. हे पचनक्रिया सुरळीत करते आणि दिवसभर नैसर्गिक ऊर्जा प्रदान करू शकते.
Photo Credit; instagram
नारळ पाणी पिण्याचे बरेच आरोग्यदायी फायदे आहेत. हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढते आणि रात्रीच्या गाढ झोपेनंतर शरीराला हायड्रेट करते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
फक्त 'हे' आयुर्वेदिक उपाय अन् काही दिवसातच झटपट वितळेल चरबी