किडनी स्टोन हा सध्या जरी सामान्य आजार असला तरी याचा खूप त्रास होतो. जेव्हा शरीरात काही मिनरल्स आणि मीठ क्रिस्टलच्या स्वरुपात जमतात तेव्हा हा आजार उद्भवतो.
Photo Credit; instagram
किडनी स्टोनच्या रुग्णांनी आपल्या डाएटविषयी सतत सावध असलं पाहिजे. कारण, काही पदार्थांच्या सेवनाने या आजाराचा त्रास अधिक वाढू शकतो. त्यापैकी एक म्हणजे दही.
Photo Credit; instagram
दहीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. जेव्हा शरीरात कॅल्शियम ऑक्सीलेटचे प्रमाण वाढते तेव्हा किडनीमध्ये जमा होऊन स्टोन बनू शकतं.
Photo Credit; instagram
जर तुम्ही टोमॅटो, पालक यासारख्या ऑक्सलेट असलेल्या पदार्थांसोबत दह्याचं सेवन केलं तर कॅल्शियम ऑक्सलेटसोबत मिळून स्टोन बनण्याची प्रक्रिया वेगानं होण्यास सुरूवात होऊ शकते.
Photo Credit; instagram
दह्यासारखे डेअरी प्रोडक्ट्स काही लोकांमध्ये यूरिनरी कॅल्शियमचे प्रमाण वाढवू शकतात. यामुळे स्टोन बनण्याची समस्येचा धोका वाढतो.
Photo Credit; instagram
जर कोणी कॅल्शियम ऑक्सलेट स्टोनचे रुग्ण असतील तर त्यांनी डॉक्टर किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने मर्यादित प्रमाणात दह्याचे सेवन केले पाहिजे.
Photo Credit; instagram
किडनी स्टोनच्या रुग्णांना भरपूर पाणी पिण्याचा, ऑक्सलेट युक्त पदार्थ कमी प्रमाणात खाण्याचा तसेच, सायट्रस म्हणजेच आंबट फळे खाण्याचा सल्ला दिला जातो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रिकाम्या पोटी चहा-बिस्किट खाताय? कधीच करू नका अशी चूक, नाहीतर...