सकाळी रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; होईल मोठं नुकसान...
Photo Credit; instagram
फळे आणि भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं सर्वांनाच माहित आहे. मात्र, असे हेल्दी फूड्स चुकीच्या वेळी खाल्ल्यास आरोग्यास नुकसान सुद्धा पोहचू शकतं.
Photo Credit; instagram
काही हेल्दी पदार्थांचं सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास फायद्यांऐवजी घातक परिणामच पाहायला मिळतात.
Photo Credit; instagram
सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचं सेवन करु नये, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
केळींमध्ये फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. मात्र सकाळी रिकाम्या पोटी यांचं सेवन केल्यास शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण अचानक वाढू शकतं. यामुळे अॅसिडिटी होऊ शकते.
Photo Credit; instagram
कॉफीमध्ये कॅफीनचं प्रमाण अधिक असल्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. सकाळी कॉफी प्यायची असल्यास आधी काहीतरी हल्के पदार्थ खाऊन नंतर त्याचं सेवन करा.
Photo Credit; instagram
दहीमध्ये पचनासाठी फायदेशीर असलेलं आणि इम्यून सिस्टिम मजबूत करणारं प्रोबायोटिक असतं. मात्र, रिकाम्या पोटी दहीचं सेवन केल्यास गॅस आणि अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.
Photo Credit; instagram
टोमॅटोमध्ये सिट्रिक अॅसिड आणि टॅनिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी हे खाल्ल्याने अॅसिडिटी आणि गॅसची समस्या होऊ शकते.
Photo Credit; instagram
संत्री, मोसंबी, लिंबूसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन C आणि सिट्रिक अॅसिड असतं. रिकाम्या पोटी याचं सेवन केल्यास अॅसिडिटी आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.
Photo Credit; instagram
कच्च्या भाज्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात आढळतं. यामुळे सकाळी रिकाम्या पोटी यांचं सेवन केल्यास गॅस्ट्रिक समस्या होऊ शकते. त्यामुळे दुपारी किंवा संध्याकाळी यांचं सेवन करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
डाएटमधून 'हे' पदार्थ आताच बाहेर काढा! कधीच येणार नाही Heart Attack