Photo Credit; instagram

अंड्यासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ; नाहीतर आरोग्यास होईल मोठं नुकसान

Photo Credit; instagram

फीटनेसकडे विशेष लक्ष देणाऱ्या व्यक्तींच्या आहारात अंडं असतंच. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, जे शरीरात दिवसभर ऊर्जा राहण्यासाठी फायदेशीर असतं.

Photo Credit; instagram

मात्र, अंड्यासोबत काही पदार्थांचं सेवन केल्यानं त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. त्यामुळे चुकूनही अंड्यासोबत अशा पदार्थांचं सेवन करू नका.

Photo Credit; instagram

अंड्यासोबत कोणत्या पदार्थांचं सेवन घातक ठरू शकतं? सविस्तर जाणून घ्या.

Photo Credit; instagram

अंड्यासोबत कधीच फळे खाऊ नका. विशेषत: लिंबू, संत्री यासारख्या आंबट फळांचं अंड्यासोबत सेवन पचनासंबंधी समस्येला कारणीभूत ठरू शकतं. खरंतर, फळं लवकर पचतात आणि अंड्यामध्ये प्रथिने असल्यामुळे ते पचायला जास्त वेळ लागतो.

Photo Credit; instagram

अंड्यासोबत थोड्या प्रमाणात पनीर खाणं फायदेशीर असतं. मात्र, अंड्यासोबत अधिक प्रमाणात पनीरचं सेवन केल्यानं अपचन आणि पोट फूगण्याच्या समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

बीन्स आणि अंडी दोघांमध्ये सुद्धा प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. यांचं एकत्र सेवन केल्याने ते पचायला जड जातं आणि त्यामुळे अपचन आणि पोट फूगण्याच्या समस्या होऊ शकतात.

Photo Credit; instagram

अंड्यासोबत चुकूनही चहा किंवा कॉफीचं सेवन करू नका. यामध्ये आढळणारं कॅफिन अंड्यामधील प्रोटीन अॅब्जॉर्ब होऊ देत नाही.

Photo Credit; instagram

कधीच अंड्यासोबत फ्राइड बटाट्यांचं सेवन करू नका. फ्राइड बटाट्यांमधील फॅट्स पचनक्रिया मंदावते आणि यामुळे पोट फूगण्याची समस्या उद्भवू शकते.

Photo Credit; instagram

अंड्यासोबत साखरेचे सेवन केल्याने पचनासंबंधी समस्या ओढवू शकतात. यामुळे गॅस आणि पोट फूगण्याची समस्या उद्भवू शकते.

पुढील वेब स्टोरी

टॉपलेस होऊन अभिनेत्रीनं केला बोल्ड फोटोशूट! कातिल अदा पाहून चाहते घायाळ

इथे क्लिक करा