मॅग्नेशियमच्या गोळ्यांमुळे चांगली झोप येते? तज्ज्ञांनी काय सांगितलंय?
Photo Credit; instagram
बरेच तास अंथरुणावर राहिल्याने सुद्धा अनेकांना झोप येत नाही. यासाठी काहीजण झोपेच्या गोळ्या घेतात. मात्र हे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतं.
Photo Credit; instagram
खरंतर नैसर्गिकरित्या वेळेवर झोप येणं हे कधीही चांगलं मानलं जातं. झोपेसाठी कोणत्याच गोळ्यांची आवश्यकता नसली पाहिजे.
Photo Credit; instagram
मात्र, ज्या लोकांना रात्री कोणत्या कारणामुळे झोप लागत नाही, असे लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने मॅग्नेशियमच्या गोळ्या घेतात. मॅग्नेशियमच्या गोळ्यांमुळे चांगली झोप येण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
तज्ज्ञांनी याविषयी काय सांगितलंय? सविस्तर जाणून घ्या.
Photo Credit; instagram
डॉक्टर्सच्या मते, मॅग्नेशियम हे शरीरासाठी आवश्यक असणारं खनिज आहे. हे मिनरल आपल्या मेंदूच्या काही खास न्यूरोट्रान्समिटर्स आणि आणि होर्मोन्स अॅक्टिव्ह ठेवतं.
Photo Credit; instagram
मॅग्नेशियम स्लिपिंग होर्मोन आणि स्ट्रेस होर्मोन नियंत्रणात ठेवण्याचं काम करतं. यामुळे चांगली झोप येते.
Photo Credit; instagram
तज्ज्ञांच्या मते, झोप न येण्याच्या बऱ्याच स्थितीमध्ये मॅग्नेशियम सप्लीमेंट फायद्याचं ठरत नाही.
Photo Credit; instagram
शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असलेल्या लोकांसाठी हे सप्लीमेंट फायदेशीर ठरते. तसेच, जास्त स्ट्रेस घेणाऱ्या आणि विचार करणाऱ्या लोकांसाठी देखील हे उपयुक्त आहे.
Photo Credit; instagram
आपली शारीरिक क्षमता विचारात घेऊन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने या गोळ्यांचं सेवन करणं फायदेशीर ठरेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
40 वयानंतरही रहा फिट... दररोज फक्त 'हे' वर्कआउट करा