Photo Credit; instagram

40 वयानंतरही राहा फिट... दररोज फक्त 'हे' वर्कआउट करा

Photo Credit; instagram

वयाच्या चाळीशीनंतर महिलांमध्ये बरेच शारीरिक बदल होतात. याच कारणामुळे त्यांच्या शरीराचं मेटबॉलिजम मंदावतं आणि हाडं कमजोर होऊ लागतात.

Photo Credit; instagram

अशातच हेल्दी आणि फिट राहण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि योग्य आहारासोबत दररोज व्यायाम करण्याची आवश्यकता असते.

Photo Credit; instagram

चाळीशीनंतर फिट राहण्यासाठी महिला त्यांच्या दैनंदिन रूटीनमध्ये कार्डियो वर्कआउटचा समावेश करु शकतात.

Photo Credit; instagram

कार्डियो वर्कआउटला एरोबिक एक्सरसाइझ देखील म्हटलं जातं. हा व्यायाम केल्याने शरीरातील हार्ट बीट्स वाढतात आणि शरीरातील ऑक्सीजनच्या पातळीत देखील वाढ होते.

Photo Credit; instagram

हा व्यायाम केल्याने शरीर तर अॅक्टिव्ह राहतंच पण त्यासोबत वजन देखील नियंत्रणात राहतं. याव्यतिरिक्त, हा व्यायाम केल्याने हृदयाच्या समस्या दूर होण्यास, रक्तदाब नियंत्रणात राहण्यास आणि फुफ्फुसे निरोगी राहण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

तज्ज्ञांच्या मते, वयाच्या चाळीशीनंतर स्टेमिना वाढवण्यासाठी आणि क्रोनिकल आजारांपासून दूर राहण्यासाठी कार्डियो व्यायाम करणं गरजेचं असतं.

Photo Credit; instagram

कार्डियो वर्कआउटमध्ये ब्रिस्क वॉकिंग (वेगानं चालणे), धावणे, सायक्लिंग, स्विमिंग, डान्सिंग, दोरी उड्या आणि पायऱ्या चढणे अशा अॅक्टिव्हिटीजचा यांचा समावेश असतो.

Photo Credit; instagram

शारीरिक आवश्यकता आणि क्षमता विचारुन घेऊन व्यायाम केला पाहिजे. तसेच व्यायाम करताना विशेषत: वयाच्या चाळीशीनंतर डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

पुढील वेब स्टोरी

फक्त 30 दिवसांत चरबी विरघळेल; दालचिनीचा 'असा' करा वापर

इथे क्लिक करा