फक्त 30 दिवसांत चरबी विरघळेल; दालचिनीचा 'असा' करा वापर
Photo Credit; instagram
दालचिनी केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर असते. सतत 30 दिवस दालचिनीच्या साहाय्याने चरबी झटपट कमी करता येऊ शकते.
Photo Credit; instagram
दालचिनी शरीराचं मेटाबॉलिजम वाढवते. यामुळे कॅलरीज वेगानं कमी होतात आणि फॅट बर्निंगची प्रक्रियासुद्धा वेगानं होते. खास करुन पोट, कंबर आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी मदत होते.
Photo Credit; instagram
सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा मध घालून प्या. यामुळे शरीर डिटॉक्स होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते.
Photo Credit; instagram
दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेत दालचिनी घालून ग्रीन टी प्यायल्याने भूक नियंत्रणात राहते तसेच गोड खाण्याची क्रेव्हिंग्स देखील कमी होते. यामुळे ब्लड शूगरची पातळी नियंत्रणात राहते.
Photo Credit; instagram
दालचिनीमध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट्स सूज कमी करतात, ज्यामुळे ब्लोटिंग आणि पोट फूगण्याची समस्या दूर करता येऊ शकते.
Photo Credit; instagram
आठवड्यातून 3 ते 4 वेळा सॅलड, ओट्स किंवा दहीमधून दालचिनीचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. यामुळे वेट लॉसची प्रक्रिया वेगानं होण्यास मदत मिळते.
Photo Credit; instagram
मात्र जास्त प्रमाणात दालचिनीचं सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. दिवसभरात 1 ते 1.5 ग्रॅम दालचिनीचं सेवन करावं. तसेच, कोणताही आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने दालचिनीचं सेवन करा.
Photo Credit; instagram
सतत 30 दिवस दालचिनीचं योग्य पद्धतीने सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच शरीर सुद्धा अॅक्टिव्ह राहण्यास मदत होते.