निरोगी शरीरासाठी नियमित योगा करण्याचा सल्ला दिला जातो. बरेचजण निश्चित वेळेत नियमित योगा करतात.
Photo Credit; instagram
अनेकजण लठ्ठपणाची समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असल्याचं पाहायला मिळतं. कंबर कमी करण्यासाठी क्लीन डाएटसोबत योगा सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतं.
Photo Credit; instagram
काही योगासनं पाठीची चरबी कमी करण्यासाठी आणि कोर मसल्स टाइट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. अशा योगासनांविषयी जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
उत्कटासन, ज्याला खुर्चीची मुद्रा किंवा देखील म्हणतात. हे आसन करताना शरीर खुर्ची सारखे खाली वाकलेले असते, त्यामुळे या आसनाला खुर्चीची मुद्रा असे म्हणतात. हे करताना हात वरच्या बाजूला आणि थोडे पुढे घ्यावे लागतात.
Photo Credit; instagram
उर्ध्वा मुख श्वानासन हा सूर्यनमस्कार आसनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे आसन झोपून केले जाते. उर्ध्व मुख श्वानासनाचा नियमित सराव केल्यास मणक्याच्या समस्या टाळता येतात.
Photo Credit; instagram
पादहस्तासन करताना पुढे वाकून हाताने पायाला स्पर्श करावा लागतो. याला 'उभ्याने पुढे वाकण्याचे आसन' असंही म्हणतात.
Photo Credit; instagram
संतुलनासन केल्याने शरीराचे संतुलन साधण्यास मदत होते. हे आसन करताना शरीराचा संपूर्ण भार हाताच्या आणि पायाच्या बोटांवर असतो. यामुळे स्नायू मजबूत होतात.
Photo Credit; instagram
वशिष्ठासन करताना शरीराचा भार हातावर आणि एका पायावर असतो. याला 'Side Plank Pose' असं म्हणतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
उशीखाली तुरटी ठेवून झोपा... फायदे जाणून थक्कच व्हाल!