सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
Photo Credit; instagram
सध्या, बरेच लोक वेगानं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. वजन कमी करण्यासाठी बरेच उपाय केले जातात.
Photo Credit; instagram
नुकतंच, आहारतज्ज्ञाने एक व्हिडीओ शेअर करत पनीर आणि भाज्यांचं सूप प्यायल्याने एका आठवड्यात 3 किलो वजन कमी करता येत असल्याचा दावा केला आहे.
Photo Credit; instagram
यावर डॉक्टरांनी नेमकं काय म्हटलंय? तसेच हे सूप बनवण्याची रेसिपी जाणून घ्या.
Photo Credit; instagram
हे सूप बनवण्यासाठी सर्वात आधी पनीरचे क्यूब्स ड्राय रोस्ट करून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्यात लसूण, गाजर, हिरव्या भाज्या, पालक, मशरूम आणि ओट्स टाकून रोस्ट करा.
Photo Credit; instagram
भाज्या शिजल्यानंतर त्यात मीठ, काळी मिरी पावडर आणि पाणी टाकून थोडा वेळ शिजवून घ्या. त्यानंतर त्यात पनीर टाका आणि सर्व्ह करा.
Photo Credit; instagram
सूपच्या सेवनाने वजन लवकर कमी करणे अशक्य नाही, परंतु डॉ. किरण सोनी यांच्या मते वजन कमी करण्यासाठी अनेक गोष्टींचा परिणाम होतो.
Photo Credit; instagram
त्या म्हणाल्या, "जर व्यक्तीचे वजन सुमारे 90-100 किलो असेल तर जलद वजन कमी करणे शक्य आहे, परंतु हे पाण्याच्या कमतरतेमुळे होऊ शकतं."
Photo Credit; instagram
डॉ. सोनीच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करणं हे व्यक्तीचं वजन, उंची आणि मेटाबॉलिक रेटवर अवलंबून असतं.
Photo Credit; instagram
त्यांच्या मते, कॅलरीजचं प्रमाण कमी करून वेगानं वजन कमी करता येऊ शकतं. याव्यतिरिक्त, जेवण्याची वेळ वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले लोक अतिशय हुशार... कमी वयातच बनतात करोडपती!