रोज रात्री प्या 'हे' ड्रिंक्स; काही दिवसातच झरझर वितळेल चरबी
Photo Credit; canva
शरीर हेल्दी आणि फिट राहण्यासाठी वजन नियंत्रणात राहणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र जर एकदा वजन वाढलं तर ते कमी करणं अवघड होऊन बसतं.
Photo Credit; canva
तुम्हीसुद्धा तुमच्या वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्याआधी काही हेल्दी ड्रिंक्सचं सेवन करुन तुमचं वजन कमी करू शकता.
Photo Credit; canva
रात्री या कोणत्या ड्रिंक्सचं सेवन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Photo Credit; canva
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचं अँटी-ऑक्सीडेंट असतं जे शरीरातील मेटाबॉलिजम बूस्ट करतं आणि फॅट बर्न करण्यासाठी उपयुक्त ठरतं. रोज रात्री ग्रीन टी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहतं आणि चांगली झोप लागते.
Photo Credit; canva
जिऱ्याचं पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. यामध्ये असलेलं थाइमोक्विनोन कंपाउन्ड मेटाबॉलिजम बूस्ट करण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं.
Photo Credit; canva
ओव्याचं पाणी पोटाच्या समस्या दूर करण्यासोबत मेटाबॉलिजम बूस्ट करण्यासाठी मदतशीर ठरतं. रात्री याचं सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात राहतं.
Photo Credit; canva
रात्री सेलेरीचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून अधिक प्रमाणात पाणी असतं. हे प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहतं.
Photo Credit; canva
दालचिनीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सीडेंट्स गुणधर्म असतात. हे डिटॉक्स ड्रिंक बनवतात. रोज रात्री दालचिनीचा चहा प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते आणि मेटाबॉलिजम बूस्ट होते.
Photo Credit; canva
नियमित व्यायाम आणि बॅलेन्ड डाएटसोबत रात्री हे ड्रिंक्स घेतल्याने वजन कमी करण्याच्या दृष्टीने काही दिवसातच चांगला फरक जाणवायला लागेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Cycling : सायकलिंगमुळे खरंच वजन कमी होतं? जाणून घ्या फॉर्म्युला...