Photo Credit; instagram

जास्त प्रमाणात पाणी पिणं आरोग्यासाठी घातक! ... कसं ते जाणून घ्या

Photo Credit; instagram

हेल्दी राहण्यासाठी डॉक्टर्स नेहमी खाण्या-पिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमध्ये योग्य बदल करण्याचा सल्ला देत असतात. यासोबतच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Photo Credit; instagram

कोणत्याही सीझनमध्ये पाण्याचं भरपूर सेवन करणं आरोग्यासाठी फायद्याचं मानलं जातं. तसेच खास करुन उन्हाळ्यात अधिक प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Photo Credit; instagram

पाणी प्यायल्याने मिळणाऱ्या फायद्यांमुळे आणि काही लोक प्रमाणापेक्षा जास्त पाणी देतात. मात्र, अधिक प्रमाणात पाणी पिणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर असतं का?

Photo Credit; instagram

कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केली तर त्याचे नुकसानच पाहायला मिळतात.

Photo Credit; instagram

मर्यादेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने आजार जडू शकतात. शरीरात जास्त पाणी असण्याच्या स्थितीला वॉटर इनटॉक्सिकेशन म्हणतात.

Photo Credit; instagram

अधिक पाणी प्यायल्याने रक्त कमजोर होऊ शकतं आणि रक्तातील मीठाचं प्रमाण कमी होऊ शकतं. याला हायपोनेट्रेमिया असं म्हणतात.

Photo Credit; instagram

जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील पेशींमध्ये पाणी शिरते आणि त्या फुगतात. अशाप्रकारे मेंदूतील पेशी फुगल्यामुळे डोकेदुखी, भ्रम आणि झटके येऊ शकतात.

Photo Credit; instagram

गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने वारंवार उल्टी आल्यासारखं जाणवतं आणि यामुळे चक्कर येऊ शकते. यासोबतच तुम्हाला श्वास घेण्याससुद्धा त्रास होऊ शकतो.

Photo Credit; instagram

दिवसभरात जवळपास 2 ते 3 लीटर पाणी पिणं फायद्याचं मानलं जातं. मात्र, पाण्याचं सेवन हे तुमच्या शारीरिक हालचाली आणि वातावरणावर सुद्धा अवलंबून असतं.

Photo Credit; instagram

आपली किडनी प्रत्येक तासाला जवळपास 0.8 ते 1 लीटर पाणी फिल्टर करते. त्यामुळे एकाच वेळी अधिक प्रमाणात पाणी पिणं धोकादायक ठरू शकतं.

पुढील वेब स्टोरी

दही खाण्याचे 'हे' नियम माहितीयेत? आयुर्वेदात काय सांगितलंय?

इथे क्लिक करा