सध्या वजन कमी करण्यासाठी सोशल मीडियावर बरेच उपाय सांगितले जातात. त्यामुळे नेमका कोणता उपाय योग्य? हे समजणं अवघड होऊन बसते.
Photo Credit; instagram
जर तुम्ही योग्य आहार आणि नियमित व्यायाम केला तर तुम्ही अगदी सोप्यारितीने तुमचं वजन कमी करू शकाल.
Photo Credit; instagram
त्यामुळे वजन कमी करताना आहारात आणि दिनचर्येत तुमच्याकडून काही चूका होऊ शकतात, ज्यामुळे बऱ्याच प्रयत्नानंतर सुद्धा तुमचं वजन कमी होत नाही.
Photo Credit; instagram
नुकतंच, भाविका पटेल या फिटनेस कोचने वजन कमी करताना अनेकदा लोकांकडून कोणत्या चूका होऊ शकतात, याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
Photo Credit; instagram
अशा 5 चूकांविषयी जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
भाज्या जरी हेल्दी असल्या तरी त्यांचं अधिक प्रमाणात सेवन करू नका. शिजवलेल्या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात फायबर वाढते. त्यामुळे एका दिवसात 300 ग्रॅम शिजवलेल्या भाज्या खाणं फायदेशीर मानलं जातं.
Photo Credit; instagram
डाळींमध्ये प्रोटीनसोबत कार्बोहायड्रेट देखील असतात. फक्त डाळींमधून प्रोटीन घेतल्याने शरीरात कार्ब्सचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे वजन कमी करण्यात अडथळे येऊ शकतात.
Photo Credit; instagram
घरात शिजवलेले पदार्थ कमी कॅलरीजचे असावेत, असं अनिवार्य नाही. मात्र, जर जास्त प्रमाणात पदार्थांचं सेवन केलं तर वजन कमी होत नाही. त्यामुळे खाण्याच्या प्रमाणात नियंत्रण असणं गरजेचं असतं.
Photo Credit; instagram
योग्य आणि बॅलेन्स्ड आहार फॉलो करा. यामध्ये नैसर्गिक सुपरफूड्सचा देखील समावेश करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
घरात 'या' ठिकाणी कधीच ठेवू नका मनी प्लांट, होईल मोठं नुकसान