Photo Credit; instagram

डिनरमध्ये 'हे' पदार्थ खा... झटपट होईल वेट लॉस

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी डिनर म्हणजेच रात्रीचं जेवण महत्त्वाची भूमिका बजावतं. डिनरमध्ये तेलकट आणि पचनासाठी जड असलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे अतिरिक्त फॅट जमा न होता वजन कमी करण्यासाठी हल्कं, पौष्टिक आणि कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचा डिनरमध्ये समावेश करायला हवा. यामुळे शरीराला पुरेसं पोषण मिळून वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

रात्रीच्या जेवणासाठी व्हेजिटेबल सूप चांगला पर्याय ठरू शकतो. याच्या सेवनाने पोट अधिक काळ भरलेलं वाटतं आणि पचनक्रिया सुरळीत होते. क्रीमविरहित आणि कमी मीठ असलेलं सूप वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

Photo Credit; instagram

काकडी, गाजर, टोमॅटो आणि कोबीसारख्या कच्च्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. या पदार्थांमध्ये खूपच कमी कॅलरीज असतात. यामध्ये थोडं मीठ किंवा लिंबू मिसळू शकता.

Photo Credit; instagram

मोड आलेले मूग, चणे किंवा मिक्स डाळी प्रोटीन आणि फायबरचं उत्तम स्त्रोत आहेत. हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असून मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी फायद्याचे ठरतात.

Photo Credit; instagram

रात्री एक वाटी वरण, कमी तेलात बनवलेली भाजी आणि 1 चपाती असा संतुलित आहार मानला जातो. यामुळे शरीराला आवश्यक प्रोटीन, फायबर आणि कार्बोहाटड्रेट्स मिळतात.

Photo Credit; instagram

लो फॅट पनीर किंवा टोफू हल्कं ग्रील्ड करुन खाल्ल्याने वजन कमी करण्यासाठी मदत मिळते. यामध्ये कमी कॅलरीज असून पचनासाठी फायदेशीर मानलं जातं.

Photo Credit; instagram

अंड्याच्या पांढऱ्या भागात भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कमी प्रमाणात फॅट्स असतात. भाज्यांसोबत बनलेलं एग व्हाइट डिनरसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

Photo Credit; instagram

रात्रीच्या जेवणानंतर ग्रीन टी घेतल्याने मेटाबॉलिजम वाढतं तसेच फॅट बर्निंगची प्रक्रिया वेगानं होण्यास मदत मिळते. हळद घातलेलं गरम दूध इम्यूनिटी वाढवण्यासाठी आणि चांगली झोप येण्यासाठी मदतशीर असते.

पुढील वेब स्टोरी

महिलांनो! पोटाचे टायर्स वाढलेत? 'हे' सूपरफूड खाऊन बघाच...

इथे क्लिक करा