वजन कमी करण्यासाठी विशेषत: पोटाची चरबी कमी करण्यासाठी क्विनोआ हे सूपरफूड फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर्स असतात.
Photo Credit; instagram
क्विनोआच्या सेवनाने पोट अधिक काळ भरलेलं वाटतं. यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होते.
Photo Credit; instagram
क्विनोआमध्ये असलेले फायबर्स पचन सुरळीत करण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
Photo Credit; instagram
क्विनोआमध्ये 9 आवश्यक अमिनो अॅसिड्स असतात. यामुळे स्नायू मजबूत होऊन मेटाबॉलिजम बूस्ट होण्यास मदत मिळते.
Photo Credit; instagram
लो कार्ब डाएटसाठी क्विनोआ उत्तम पर्याय असल्याचं सांगितलं जातं. यामध्ये रिफाइंड कार्ब्स नसून हे ब्लड शूगर नियंत्रित करण्यासाठी मदत करतं.
Photo Credit; instagram
क्विनोआमध्ये भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B असतं, जे होर्मोन्स बॅलेन्स करण्यासाठी मदतशीर ठरतात.
Photo Credit; instagram
सॅलड किंवा खिचडीमध्ये क्विनोआ उकडून त्याचं सेवन करु शकता. डाएटमध्ये क्विनोआचा समावेश केल्यास केवळ 30 दिवसातच चांगला फरक पाहायला मिळेल.