ज्या मुलींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला होतो, त्यांचा मुलांक 7 असतो. अशा मुलींची स्वामी ग्रह केतू असून त्या अत्यंत रहस्यमयी असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
7 मुलांक असलेल्या मुलींकडे अद्भूत इंट्यूशन म्हणजेच अंतर्ज्ञान असतं. काहीही सांगता त्या इतरांच्या भावना समजू शकतात. या मुलींचं सहावं इंद्रिय तीक्ष्ण असतं आणि हेच यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतं.
Photo Credit; instagram
अशा मुली कला, साहित्य, मीडिया, डिझायनिंग आणि मॅनेजमेंट सारख्या क्षेत्रात आपली ओळख बनवू शकतात. कोणतंही काम वेगळं आणि अनोख्या पद्धतीनं करण्याकडे या मुलींचा कल असतो.
Photo Credit; instagram
या मुलींचं संवाद कौशल्य लक्ष वेधक असतं. त्यांचं बोलणं आणि विशेषत: त्यांचे केस नेहमी व्यक्तीमत्त्वाबद्दल खास संकेत देत असतात.
Photo Credit; instagram
मात्र, नेहमी छोट्या कारणांवरुन घाबरुन जाणं हा त्यांचा कमकुवतपणा असतो. अशा मुलींच्या जीवनात बरेच चढ-उतार येत असतात. तसेच भावनिकदृष्ट्या या मुली असंतुलित होऊ शकतात.
Photo Credit; instagram
अशा मुलींना जीवनात खूप चांगले साथीदार मिळतात. मात्र मित्रांच्या बाबतीत त्यांना नेहमी धोका मिळतो. या मुली लगेच कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवतात आणि लोक त्यांच्या निरागस स्वभावाचा फायदा घेतात.
Photo Credit; instagram
7 मुलांक असलेल्या मुलींसाठी पूजा, मेडिटेशन आणि ध्यान करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अशा मुलींनी गडद रंगांचे कपडे परिधान करणं टाळावे तसेच, जास्त पांढरा, हिरवा आणि पिवळ्या रंगांचे कपडे परिधान करावेत.
Photo Credit; instagram
प्रेमसंबंधांच्या बाबतीत या मुलींनी सावध राहायला हवं. केतुचा प्रभाव रहस्यमय असला तरी योग्य दिशा मिळाल्यास या मुली चमत्कारी ठरू शकतात.
Photo Credit; instagram
इथे देण्यात आलेली माहिती अंकशास्त्रावर आधारित असून 'मुंबई tak' याची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मॅग्नेशियमच्या गोळ्यांमुळे चांगली झोप येते? तज्ज्ञांनी काय सांगितलंय?