महिलांनो! 30 वयानंतर डाएटमध्ये 'या' ड्रायफ्रूट्सचा समावेश करा, त्वचा दिसेल तरुण अन्...
Photo Credit; instagram
वयाच्या 30 वर्षांनंतर हॉर्मोनल बदलांमुळे आणि मेटाबॉलिजममधील कमतरतेमुळे महिलांना अधिक न्यूट्रिशनची गरज भासते.
Photo Credit; instagram
वाढत्या वयात शरीरातील बऱ्याच बदलांमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या वयामध्ये संतुलित आहार घेणं अत्यंत गरजेचं असतं. तज्ज्ञसुद्धा महिलांना आहारात काही ड्रायफ्रूट्सचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
Photo Credit; instagram
ड्रायफ्रूट्समध्ये हाडं मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले पोषक घटक आढळतात. यामुळे इम्यूनिटी बूस्ट होण्यास आणि त्वचा ग्लोइंग होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
महिलांनी वयाच्या 30 वर्षांनंतर आहाराच कोणत्या ड्रायफ्रूट्सचा समावेश करायला हवा? सविस्तर जाणून घ्या.
Photo Credit; instagram
महिलांनी आपल्या आहारात मनुक्यांचा समावेश करायला हवा. यामधील मोठ्या प्रमाणात असलेले अँटी-ऑक्सीडेंट्स, लोह आणि व्हिटॅमिन B ब्लड सर्क्यूलेशन चांगलं होण्यास आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
अंजीरमध्ये मुबलक प्रमाणात फायबर्स, कॅल्शियम आणि अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. यांच्या सेवनाने बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवता येते. अंजीर महिलांमधील इस्ट्रोजेनची पातळी बॅलेन्स करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते.
Photo Credit; instagram
खजूर लोहाचं उत्तम स्त्रोत मानलं जातं. याच्या सेवनाने रक्तातील कमतरता भरून काढता येते आणि यामधील मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर्स पचनक्रिया सुरळीत करण्यास आणि इलेक्ट्रोलाइट्सचं बॅलेन्स राखण्यास मदतशीर ठरते.
Photo Credit; instagram
बदामांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन E भरपूर प्रमाणात असते, जे हाडे मजबूत ठेवण्यास आणि हृदयरोगांपासून दूर राहण्यास मदत करते. 30 वयानंतर हाडाचं आरोग्य चांगलं राखण्यास दररोज भिजवलेल्या बदामांचं सेवन करणं फायद्याचं ठरेल.
Photo Credit; instagram
30 वर्षांनंतरच्या महिलांनी अक्रोडला त्यांच्या आहाराचा भाग बनवायला हवा. त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन E असते हे घटक मेंदू, त्वचा आणि हृदयाच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रोज सकाळी Cow Pose केल्याने काय होतं? फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क