Photo Credit; instagram

कंबर नाही ही तर बनलीय... वाढलेली कंबर कमी करण्याच्या नामी Tips!

Photo Credit; instagram

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे शरीराची चरबी वाढण्याची समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. लठ्ठपणामुळे बरेच आजार सुद्धा उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करून कंबर अगदी सडपातळ करायची असेल तर तुमच्या लाइफस्टाइलमध्ये काही बदल करून केवळ 30 दिवसातच चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात.

Photo Credit; instagram

डाएटमध्ये कमी कॅलरी आणि कमी फॅट असलेल्या पदार्थांचा समावेश करा. तसेच तेल, मसाले पदार्थ, मैदा आणि साखरयुक्त पदार्थांचं प्रमाण कमी करा.

Photo Credit; instagram

आहारात हिरव्या भाज्या, फळे, मासे, दही किंवा स्किम्ड मिल्क, ड्रायफ्रूट्स आणि चिया सिड्स किंवा आळशी सारख्या बियांचा समावेश करणं फायद्याचं ठरेल. यामुळे शरीराला बरीच पोषकतत्त्वं मिळतात आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

शरीरात पाण्याच्या कमतरतेचा वेट लॉसवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्या. याव्यतिरिक्त, नारळ पाणी, लिंबू पाणी, भाज्यांचा ज्यूस आणि हर्बल ड्रिंक्सचं सेवन करणं फायदेशीर ठरेल.

Photo Credit; instagram

दररोज 30 ते 40 मिनिटे वॉकिंग, जॉगिंग, सायक्लिंग आणि स्विमिंग सारखे व्यायाम केल्याने पोटाची चरबी कमी करता येऊ शकते.

Photo Credit; instagram

याशिवाय, सूर्य नमस्कार, भूजंगासन सारखी योगासनं बेली फॅट कमी करण्याच्या दृष्टीने फायद्याची ठरू शकतात. नियमित व्यायाम केल्याने वजन तर कमी होतेच, पण ओव्हरऑल हेल्थसुद्धा सुधारते.

Photo Credit; instagram

चांगली झोप आणि तणावापासून दूर राहणं वेट लॉससाठी उपयुक्त आहे. त्यामुळे रात्री 7 ते 8 तासांची पुरेशी झोप घ्या आणि ताण कमी करण्यासाठी मेडिटेशन, डीप ब्रीदिंग सारख्या अॅक्टिव्हिटीज फॉलो करा.

पुढील वेब स्टोरी

यूरिक अॅसिडचा त्रास होतोय? मग 'हे' ड्रायफ्रूट ठरेल फायदेशीर!

इथे क्लिक करा