सावधान! आंब्यासोबत 'हे' पदार्थ खाताय? तब्येतीचा विषय होईल गंभीर
Photo Credit; canva
उन्हाळ्यात आंबे खाणं जवळपास प्रत्येकालाच आवडतं. मात्र, काही असे पदार्थ आहेत, ज्यांचं आंब्यासोबत सेवन केल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात.
Photo Credit; canva
आंब्यासोबत काही पदार्थांचं सेवन करुन लोक वेगळे फूड कॉम्बिनेशन बनवतात आणि त्याचं सेवन करतात.
Photo Credit; canva
आंब्यासोबत काही वेगळे फूड कॉम्बिनेशन पचनक्रियेवर वाईट परिणाम करू शकतात. यामुळे अॅलर्जी किंवा अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.
Photo Credit; canva
आंब्यासोबत दुधाचं सेवन महागात पडू शकतं. विशेषत: आंबा अधिक गोड आणि जास्त पिकलेला असल्यास आरोग्याल नुकसान पोहचू शकतं. यामुळे गॅस किंवा अॅसिडिटीसारख्या समस्या होऊ शकतात.
Photo Credit; canva
आंबा खाल्ल्यानंतर लगेच थंड पेय जसे की कोल्ड ड्रिंक किंवा थंड पाणी प्यायल्याने गळा खराब होऊ शकतो. यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार जडू शकतात.
Photo Credit; canva
दही आणि आंबा कफ होण्यासाठी कारणीभूत ठरणारे पदार्थ आहेत. आंबा आणि दह्याचं एकत्र सेवन केल्याने कफ आणि घसा खवखवण्याची समस्या होऊ शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
वेट लॉस करताना 'या' चूका... कधीच कमी होणार नाही वजन