ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? झटपट वेटलॉस साठी काय आहे अधिक फायदेशीर?
Photo Credit; instagram
ग्रीन टी आणि ब्लॅक कॉफीमध्ये कमी कॅलरीज असून मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. हे मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी आणि फॅट बर्न करण्यासाठी मदत करतात.
Photo Credit; instagram
मात्र, अगदी वेगानं वजन कमी करण्यासाठी दोघांपैकी अधिक फायदेशीर काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडत असेल.
Photo Credit; instagram
ग्रीन टीमध्ये EGCG नावाचा घटक असतो, जो फॅट बर्न करण्यासाठी उपयुक्त असतो. यामध्ये कमी प्रमाणात कॅफीन असून मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं.
Photo Credit; instagram
तसेच, ब्लॅक कॉफीमध्ये कॅफीनचं प्रमाण अधिक आढळतं. याच्या सेवनाने शरीर एनर्जेटिक राहण्यासाठी आणि कॅलरीज बर्न होण्यासाठी जास्त मदत मिळते.
Photo Credit; instagram
ग्रीन टीमध्ये थोड्या प्रमाणात कॅफिन असते जे EGCG सोबत फॅट बर्निंगचं काम करते. ब्लॅक कॉफीमध्ये ग्रीन टीपेक्षा जास्त कॅफिन असते, म्हणूनच ते मेटाबॉलिजम अधिक प्रमाणात वाढवते.
Photo Credit; instagram
ब्लॅक कॉफी काही तासांसाठी भूक कमी करते तर ग्रीन टी प्यायल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
ब्लॅक कॉफीमध्ये जास्त कॅफीन असते, त्यामुळे जास्त प्रमाणात प्यायल्याने शारीरिक समस्या होऊ शकतात. दुसरीकडे, ग्रीन टीमध्ये कमी कॅफिन असते, त्यामुळे याच्या सेवनाने शारीरिक समस्यांचा धोका कमी होतो.
Photo Credit; instagram
हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचे असल्यास ग्रीन टी फायदेशीर ठरते. तसेच, जलद वजन कमी करायचे असेल आणि वर्कआउटसाठी जास्त उर्जेची आवश्यकता असल्यास ब्लॅक कॉफी उत्तम पर्याय ठरते.
Photo Credit; instagram
यासोबतच वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
महिलांनो! 30 वयानंतर डाएटमध्ये 'या' ड्रायफ्रूट्सचा समावेश करा, त्वचा दिसेल तरुण अन्...