Photo Credit; instagram

केळी खाताना फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा... कधीच वाढणार नाही वजन!

Photo Credit; instagram

केळं हे एक अतिशय चविष्ट फळ असून ते वर्षभर सहज उपलब्ध असते. केळीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात.

Photo Credit; instagram

मात्र, केळीचा संबंध बऱ्याचजदा लठ्ठपणाशी जोडला जातो. वजन कमी असलेल्या लोकांना वजन वाढवण्यासाठी बनाना शेक पिण्याचा सल्ला दिला जातो.

Photo Credit; instagram

केळी खाल्ल्याने वजन वाढतं असं समजून ते खात नाहीत. योग्य पद्धतीने केळींचं सेवन केल्यास तुम्हाला त्याचे फायदे मिळतील आणि तुमचे वजनही वाढणार नाही.

Photo Credit; instagram

दिवसातून फक्त एकच केळ खा. एकाच वेळी जास्त केळी खाल्ल्याने चरबी वाढू शकते. जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने तुमचं वजन झपाट्यानं वाढतं.

Photo Credit; instagram

केळीमध्ये असलेल्या साखरेमुळे ते रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते.

Photo Credit; instagram

दुधात केळी मिसळून त्यात साखर टाकून कधीच मिल्कशेक म्हणून घेऊ नका. केळीच्या मिल्कशेकमध्ये अंदाजे 250 ते 300 कॅलरीज असतात. या कॅलरीजमुळे शरीराची चरबी वाढते.

Photo Credit; instagram

रात्रीच्या जेवणानंतर कधीही केळी खाऊ नये. यावेळी केळी खाल्ल्याने शरीरात कॅलरीजची पातळी वाढते आणि शरीर कोणतंही काम करत नसल्यामुळे कॅलरीज बर्न होत नाहीत.

Photo Credit; instagram

कधीच कच्ची केळी खाऊ नये. असं केल्यास पोटासंबंधी बऱ्याच समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

जास्त पिकलेली केळी खाणं टाळावे. जास्त पिकलेल्या केळ्यांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात.

पुढील वेब स्टोरी

शर्वरी वाघच्या Toned फिगरचं सीक्रेट आहे तरी काय? सर्वात बेस्ट डाएट करते फॉलो

इथे क्लिक करा