इंटरमिटंट फास्टिंग करताय? पण आधी 'हे' 5 नुकसान पाहा...
Photo Credit; instagram
आजकाल वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचं ट्रेंड वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. हे करण्यासाठी लोक दिवसातून काही तास फास्टिंग करतात.
Photo Credit; instagram
बरेच लोक 16 तास फास्टिंग करतात आणि 8 तासांमध्ये जेवतात. यामुळे ब्लड शूगर नियंत्रणात राहते. त्यासोबतच पचनक्रिया सुरळीत होऊन फॅट बर्न होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
मात्र, इंटरमिटंट फास्टिंग हे प्रत्येकासाठीच फायद्याचं ठरत नाही.
Photo Credit; instagram
यामुळे होणाऱ्या काही साइड इफेक्ट्स बद्दल जाणून घेऊया.
Photo Credit; instagram
जर बराच काळ न जेवल्याने शरीरावर ताण येतो आणि कॉर्टिसोलची पातळी वाढते. यामुळे चिंता, थकवा येतो आणि पोटाची चरबी देखील वाढू शकते.
Photo Credit; instagram
बऱ्याच महिलांसाठी जास्त वेळ फास्टिंग केल्याने इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्समध्ये अडथळा येऊ शकतो. यामुळे मासिक पाळीत व्यत्यय येऊ शकतोआणि गर्भधारणेदरम्यानही समस्या येऊ शकतात.
Photo Credit; instagram
जास्त फास्टिंग केल्याने मेटाबॉलिजम मंद होऊ शकते. यामुळे वजन कमी होण्याऐवजी, तुमचे वजन हळूहळू वाढू लागते.
Photo Credit; instagram
बराच काळ फास्टिंग केल्यानंतर पटापट खाल्ल्यामुळे गॅस, अॅसिडिटी, पोटदुखी किंवा बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
काही लोक अधूनमधून फास्टिंग करताना खाण्याचा जास्त विचार करतात. अशा परिस्थितीत, जास्त खाल्ल्यामुळे त्यांना गिल्टी वाटतं. असं सतत केल्याने तुमच्या मनात खाण्याबद्दल चुकीची धारणा निर्माण होऊ शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बॅकलेस अदांवर सगळेच फिदा, फोटोतील 'ती' अभिनेत्री कोण?