सतत बूट घातल्याने होईल मोठं नुकसान! डॉक्टरांनी काय सांगितलंय?
Photo Credit; instagram
साधारणपणे कॉलेज आणि ऑफिसला जाणारे लोक दररोज बराच वेळ शूज घालणं पसंत करतात. कोणत्याही प्रसंगासाठी योग्य असण्यासोबत बूट आरामदायी असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
मात्र, दिवसभर बूट घालणे आपल्या पायांसाठी योग्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. याबद्दल मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयातील डॉक्टरांनी काय सांगितलं? जाणून घ्या.
Photo Credit; instagram
कन्सल्टंट पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. विकास बासा यांच्या मते, जास्त वेळ शूज घातल्याने पाय एकाच स्थितीत अडकतात. यामुळे पायाचे स्नायू कडक आणि कमकुवत होतात.
Photo Credit; instagram
सतत विशेषत: पायांना घट्ट बसणारे शूज घातल्याने पायांची नैसर्गिक हालचाल कमी होते आणि यासंबंधी बऱ्याच समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
पाय एकाच स्थितीत ठेवल्याने स्नायू कमकुवत होतात आणि यामुळे पाय दुखणे, प्लांटार फॅसिटायटिस आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, पायांना घट्ट बसणारे म्हणजेच खराब फिटिंग असलेले शूज पायांना जळजळीसाठी कारणीभूत ठरतात. यामुळे फोड, कॉर्न आणि कॉलससारखे त्वचेचे संक्रमण होऊ शकते.
Photo Credit; instagram
चुकीच्या आकाराचे आणि फिटिंगचे शूज परिधान केल्याने शरीराचं आरोग्य बिघडू शकतं, ज्यामुळे पाठ किंवा कंबरेमध्ये देखील वेदना होऊ शकतात.
Photo Credit; instagram
दिवसभर शूज घालल्याने पायांना जास्त घाम येतो आणि उन्हाळ्यात ही समस्या वाढते. त्यामुळे पायांमध्ये बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाची शक्यता वाढते.
Photo Credit; instagram
डॉ. बासा यांच्या मते, ते लोकांना निश्चित अंतराने पायातील शूज काढण्याचा सल्ला देतात जेणेकरून पायांना श्वास घेण्याची संधी मिळेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
ब्रेकअपनंतर सुद्धा अभिनेता 15 वर्षे मोठी Ex च्या प्रेमात? म्हणाला, "आज सुद्धा तू माझी..."