Photo Credit; instagram

अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असलेले पदार्थ माहितीयेत? शाकाहारी असलेल्यांनी नक्की वाचा

Photo Credit; instagram

प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी अंडं उत्तम पर्याय असल्याचं अनेकांच्या मनात येतं.

Photo Credit; instagram

आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जाणाऱ्या अंड्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याला शिजवून त्यांचं सेवन करणं देखील सोप्पं असतं.

Photo Credit; instagram

मात्र, काही असे पदार्थ आहेत ज्यात अंड्यापेक्षा अधिक प्रमाणात प्रोटीन आढळतं. अशा पदार्थांविषयी सविस्तर जाणून घ्या.

Photo Credit; instagram

अंड्यामध्ये जवळपास 6 ग्रॅम प्रोटीन असतं. मात्र या पदार्थांमध्ये अंड्यापेक्षा अधिक प्रोटीन असून त्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि हृदय निरोगी ठेवणारे पोषक तत्त्वं भरपूर प्रमाणात आढळतात.

Photo Credit; instagram

एक कप शिजलेल्या सोयाबीनमध्ये सुमारे 16.5 ग्रॅम प्रोटीन असतं. यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे अमिनो अॅसिड्स असतात. तसेच, फायबर्स, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि हृदयाच्या स्वस्थ्यासाठी फायदेशीर असणारे घटक असतात.

Photo Credit; instagram

डाळी या प्रोटीनचं उत्तम स्त्रोत मानल्या जातात. अर्धा कप डाळीमध्ये सुमारे 9 ग्रॅम प्रोटीन असतं. सूप, सॅलड किंवा इतर पदार्थांमध्ये डाळींचा सोप्यारितीने समावेश करता येतो.

Photo Credit; instagram

अर्धा कप राजमामध्ये सुमारे 7.5 ग्रॅम प्रोटीन असतं. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स, पोटॅशियम आणि अँटीऑक्सीडेंट्स असतात.

Photo Credit; instagram

ब्लॅक बीन्ससुद्धा प्रोटीनचं चांगलं स्त्रोत मानलं जातं. अर्धा कप ब्लॅक बीन्समध्ये सुमारे 7.5 ग्रॅम प्रोटीन असतं. यामध्ये असणारे अँटीऑक्सीडेंट्स आणि फायबर्स बऱ्याच आजारांपासून बचाव करतात.

Photo Credit; instagram

लीमा बीन्स ज्याला पावटा किंवा वाल म्हटलं जातं. हे फायबर्स, पोटॅशियम, फोलेट आणि मोलिब्डेनमचं उत्तम स्त्रोत असल्याचं सांगितल जातं. हे पचनक्रियेसाठी फायदेशीर मानलं जातं.

Photo Credit; instagram

छोले म्हणजेच काबुली चण्यांमध्ये जवळपास 7 ग्रॅम प्रोटीन असून प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी उत्तम पर्याय मानल्या जातात. यामध्ये फायबर्स, फोलेट आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असून हृदय आणि पचनासाठी उपयुक्त मानल्या जातात.

पुढील वेब स्टोरी

रोज सकाळी घ्या ‘हे’ ड्रिंक; आरोग्यासाठी ठरेल लाभदायक

इथे क्लिक करा