सध्याची धावपळीची जीवनशैली आणि आहाराची अयोग्य पद्धत हार्ट अटॅकला कारणीभूत ठरू शकते. याची काही लक्षणं ही आधीच दिसत असून डोळ्यांमध्ये हार्ट अटॅकची काय लक्षणं दिसतात? जाणून घ्या.
Photo Credit; instagram
हार्ट अटॅक आधी डोळ्यांच्या रेटिनामधील ब्लड सप्लाय थांबू शकतो आणि यामुळे अचानक समोरचं दिसणं बंद होतं. हे हार्ट अटॅकचं लक्षण असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
डोळ्यांच्या आयलिडजवळ पिवळ्या रंगाचा प्लॅक दिसणं हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. कोलेस्ट्रॉल जमल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते.
Photo Credit; instagram
डोळ्यांमध्ये ब्लड क्लॉटिंगमुळे डोळ्यांच्या नसांमध्ये ब्लॉकेज होऊ शकतं. यामुळे डोळ्यांमध्ये वेदना आणि तणाव जाणवू लागतो.
Photo Credit; instagram
डोळ्यांच्या रक्तवाहिन्या डॅमेज होणं ही केवळ डोळ्यांची समस्या नसून ती हृदयरोगासंबंधी गंभीर समस्या असू शकते.
Photo Credit; instagram
डोळ्यांमध्ये वारंवार जळजळ, जडपणा आणि अंधुक दिसणं हाय ब्लड प्रेशरसाठी कारणीभूत असू शकतं. यामुळे हार्ट अटॅक होण्याचा धोका वाढतो.
Photo Credit; instagram
लहानसहान डोळ्यांच्या समस्या या गंभीर आजाराला आमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे नियमित डोळ्यांची तपासणी केल्याने अशा समस्यांना आळा घालता येऊ शकतो.
Photo Credit; instagram
जर तुमच्या डोळ्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे लक्षणं दिसली तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. यामुळे तुमच्या हार्ट अटॅकच्या गंभीर समस्येला आळा घालता येऊ शकतो.