अंजीर या फळाचे बरेच आरोग्यदायी फायदे असल्याचे आपल्याला माहित आहे. परंतु, ड्रायफ्रूट म्हणून अंजीर हे सुपरफूड मानले जाते. हा सुखा मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Photo Credit; instagram
अंजीर हे नैसर्गिक अफ्रोडिसिएक म्हणून ओळखलं जातं. या फळातील झिंक, मॅग्नेशियम आणि लोह टेस्टोस्टेरॉनची पातळी नियंत्रणात आणि संतुलित ठेवण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
वर्कआउट करणाऱ्या पुरुषांसाठी अंजीर अतिशय उपयुक्त मानले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, मॅग्नेशियम आणि मिनरल्स आढळतात. अंजीर एनर्जी बूस्टर म्हणून देखील काम करते.
Photo Credit; instagram
अंजीरमध्ये मुबलक प्रमाणात फायबर आणि अॅंटीऑक्सीडेंट्स असल्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास आणि हृदय रोगांपासून बचाव होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
अंजीरमध्ये फायबरचे अधिक प्रमाण असल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनासारख्या आजारांपासून सुटका मिळवता येते. रोज सकाळी भिजवलेले 2 ते 3 अंजीर खाल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
शरीरात कमजोरी आणि थकवा जाणवत असल्यास दुधात अंजीर घालून ते उकळवून प्यायल्याने चांगला फायदा होतो. यासोबतच रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
काही संशोधनानुसार, अंजीरमध्ये प्रोटेस्ट स्वस्थ राहण्यासाठी आवश्यक असलेले तत्त्व आढळतात. वाढत्या वयासोबत पुरुषांनी अंजीरच्या सेवनाचे प्रमाण वाढवले पाहिजे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!