माणसाच्या आयुष्यात मानसिक ताण तणावाची गोष्ट कधीही येऊ शकते. मात्र काही गोष्टींची तुम्ही काळजी घेतली नाही तर मात्र तोच तणाव तुम्हाला नैराश्यग्रस्त बनवू शकतो.
आज आम्ही तुम्हाला अशा सवयींबद्दल सांगत आहोत, जिच्यामुळे तुम्ही डिप्रेशनचा शिकारही होऊ शकता.
अनेक गोष्टींमुळे आणि गुंतागुंतीमुळे जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्हाला नैराश्य येऊ शकते.
सतत नकारात्मक विचार करणे आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले नाही. स्वतःला कमी लेखणे आणि नकारात्मक विचार करणे डिप्रेशन वाढवू शकते.
अशा वेळी स्वत:ला एकटे ठेवणे आणि नकारात्मकतेने विचार करणे हे तुमच्यासाठी अवघड जाण्याची शक्यता असते.
तणाव आणि गोंधळामुळे वर्कआउट न केल्याने तुमच्या समस्या वाढू शकतात. तणाव कमी करण्यासाठी वर्कआउट खूप महत्त्वाचे आहे.
आपल्या खाण्याच्या सवयी अनेकदा तणावग्रस्त परिस्थितीमध्ये तुम्ही जर आहार घेत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आणि तुमचे डिप्रेशन वाढवू शकते.
सोशल मीडिया हा वास्तव आयुष्यातील एक फक्त भाग आहे. त्यामुळे त्याचा वापर तुम्हा अगदी जपून केला पाहिजे. त्याच्या अतिवापरामुळेही तुम्हाला डिप्रेशन येऊ शकते.