सकाळची झोप मोडायची असेल किंवा संध्याकाळचा थकवा दूर करायचा असल्यास लोक चहा किंवा कॉफी घेतात.
Photo Credit; instagram
चहा आणि कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेटाबॉलिजम वाढवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
मात्र, चहा की कॉफी? सकाळी नेमकं काय पिणं अधिक फायदेशीर ठरतं? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल.
Photo Credit; instagram
चहामध्ये पॉलीफेनॉल नावाचा घटक असतो, जो अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतो. यामुळे शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
याव्यतिरिक्त, चहामध्ये अमीनो अॅसिड असतं जे मूड चांगला ठेवण्यासाठी आणि वैचारिक क्षमता सुधारण्यासाठी फायद्याचं असतं.
Photo Credit; instagram
कॉफीमध्ये कॅफिन नावाचा घटक आढळतो. हा घटक मूड सुधारण्यास आणि शरीर अॅक्टिव्ह ठेवण्यास मदत करतो.
Photo Credit; instagram
याव्यतिरिक्त, कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे शरीरातील जळजळ कमी करण्यास आणि मेंदूच्या पेशींना सपोर्ट करण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
कॉफीमध्ये भरपूर कॅफिन असल्याने, जास्त प्रमाणात प्यायल्याने तुम्हाला चिडचिड, निद्रानाश आणि डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. चहामध्ये कॉफीपेक्षा कमी कॅफिन असते.
Photo Credit; instagram
जर शरीराला जास्त ऊर्जेची गरज असेल तर कॉफी चांगली आहे आणि तुमच्या शरीराला विश्रांतीची गरज असल्यास कॉफीचं सेवन फायदेशीर ठरतं.