Photo Credit; instagram

तुम्ही वयाच्या चाळीशीत पोहोचलाय? 'हे' 3 व्हिटॅमिन्स नक्की घ्या

Photo Credit; instagram

व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. वाढत्या वयात शरीरासाठी या व्हिटॅमिन्सची गरज जास्त भासते.

Photo Credit; instagram

वय वाढण्यासोबत आपल्या शरीराच्या गरजा देखील बदलू लागतात. यावेळी बोन डेन्सिटी कमी होऊ लागते.

Photo Credit; instagram

या वयात शरीरात एनर्जी लेव्हल ड्रॉप होते आणि उच्च रक्तदाब, डायबिटीज आणि थायरॉइड सारख्या आजारांचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

त्यामुळे वयाच्या चाळीशीनंतर शरीराला कोणत्या व्हिटॅमिन्सची जास्त गरज असते? याविषयी सविस्तर जाणून घ्या.

Photo Credit; instagram

व्हिटॅमिन D आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं असतं. सूर्यप्रकाश हा याचा सोपा स्त्रोत आहे. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीरात कॅल्शियमचं शोषण पुरेशा प्रमाणात होत नाही. त्यामुळे फ्रॅक्चर आणि ओस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे स्मृतीभ्रंश सारखी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे वयाच्या चाळीशीनंतर शरीरात एनर्जी प्रोडक्शनसाठी व्हिटॅमिन B12 महत्त्वाची भूमिका बजावते.

Photo Credit; instagram

हे व्हिटॅमिन रक्तातील लाल रक्त पेशी बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात आणि हृदयाच्या स्वास्थ्यासाठी देखील आवश्यक मानलं जातं.

Photo Credit; instagram

व्हिटॅमिन C आपल्या शरीरासाठी पॉवरफूल्ल अँटीऑक्सीडेंट मानलं जातं. हे व्हिटॅमिन वृद्धत्वासाठी कारणीभूत असलेल्या फ्री रेडिकल्सना न्यूट्रिलाइझ करतं आणि कोलेजन प्रोडक्शनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं.

Photo Credit; instagram

कोलेजन त्वचा टाइट ठेवण्यासाठी आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असणारं प्रोटीन आहे. तसेच व्हिटॅमिन C शरीराची इम्यून सिस्टिम सुद्धा मजबूत करते.

पुढील वेब स्टोरी

दररोज प्या 'हा' पिवळा चहा; आरोग्यासाठी ठरेल चमत्कारी!

इथे क्लिक करा