शाकाहारी लोकांचा 'हा' असतो मोठा प्रॉब्लेम; पण घेऊ नका टेन्शन, फक्त...
Photo Credit; instagram
बऱ्याचदा शाकाहारी लोकांना दररोजच्या आहाराच पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळू शकल्याने शरीरात प्रोटीनची कमतरता भासू लागते.
Photo Credit; instagram
प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या शरीराच्या वजनानुसार आवश्यक तितके ग्रॅम प्रथिने सेवन करावी. जर तुमचे वजन 56 किलो असेल तर तुम्ही दररोज 56 ग्रॅम प्रथिनांचं सेवन करावं.
Photo Credit; instagram
मांसाहारी लोकांना त्यांच्या शरीरातील प्रोटीनची गरज पूर्ण करणे खूप सोपे आहे परंतु बऱ्याच शाकाहारी लोकांना प्रथिनांचं प्रमाण योग्य ठेवणं तितकंच कठीण असतं.
Photo Credit; instagram
तुम्हीसुद्धा शाकाहारी असाल आणि शरीरात प्रथिनांचं प्रमाण कमी प्रमाणात जाणवत असल्यास तुमच्या दररोजच्या आहारात तुम्ही 'या' पदार्थांचा समावेश करू शकता.
Photo Credit; instagram
भांगाच्या बिया या भांगाच्या वनस्पतीपासून मिळतात. 100 ग्रॅम भांगाच्या बियांमध्ये जवळपास 20 ग्रॅम प्रथिने आढळतात.
Photo Credit; instagram
भोपळ्याच्या बियासुद्धा प्रोटीनचा चांगला स्रोत मानल्या जातात. 100 ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये सुमारे 19 ग्रॅम प्रोटीन आढळतं.
Photo Credit; instagram
जवसाच्या बियांमध्ये बऱ्याच प्रकारची पोषक तत्त्वं आढळतात. 100 ग्रॅम जवसाच्या बियांमध्ये सुमारे 18 ग्रॅम प्रथिने आढळतात.
Photo Credit; instagram
स्पायरुलिना ही एकपेशीय वनस्पती असून ते सुपरफूड मानलं जातं. यात प्रोटीन, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. 100 ग्रॅम स्पायरुलिनामध्ये सुमारे 57 ग्रॅम प्रथिने आढळतात.
Photo Credit; instagram
राजमा आणि बीन्समध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रथिने आढळतात. 170 ग्रॅम शिजवलेल्या बीन्समध्ये सुमारे 15 ग्रॅम प्रथिने आढळतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...