'या' लोकांनी बटाट्याला हातही लावायचा नाही, अहो काय म्हणून का विचारता...
Photo Credit; instagram
भारतीय जेवणात सर्रास बटाट्याचा वापर केला जातो. मात्र, हे जितके चविष्ट असतात, तितकेच काही लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने घातक मानले जातात.
Photo Credit; instagram
बटाट्यामध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. याचं सेवन करणं काही आजारांमध्ये नुकसान पोहचवू शकतं. कोणत्या लोकांसाठी बटाट्याचं सेवन टाळलं पाहिजे? सविस्तर जाणून घ्या.
Photo Credit; instagram
बटाट्यामध्ये हाय ग्लाइसेमिक इंडेक्स असून ते रक्तातील साखर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांनी याचं सेवन करणं टाळलं पाहिजे किंवा मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे.
Photo Credit; instagram
बटाट्यामध्ये स्टार्च आणि कॅलरीजचे प्रमाण अधिक आढळते. जास्त प्रमाणात याचं सेवन केल्यानं वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे डाएटिंग करणाऱ्या लोकांनी याचं सेवन मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे.
Photo Credit; instagram
तळलेल्या बटाट्यांच्या पदार्थांमध्ये (जसे की, फ्रेंच फ्राइज, समोसे) मीठ आणि तेलाचं प्रमाण खूप जास्त असतं. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या आणखी वाढू शकते.
Photo Credit; instagram
पोटात गॅस किंवा अॅसिडिटी असलेल्या लोकांनी बटाट्याचं सेवन करणं टाळलं पाहिजे. काही लोकांना बटाटे खाल्ल्यानंतर ब्लोटिंग, गॅस किंवा अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.
Photo Credit; instagram
बटाट्यांचं सेवन केल्याने काही लोकांमध्ये शरीरात संधिवाताची लक्षणं वाढू शकतात. त्यामुळे संधिवात असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बटाट्यांचं सेवन करा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मलायका अरोराचा Ex Husband दुसऱ्यांदा होणार बाबा, 'तिने' दिली गुड न्यूज!