Photo Credit; instagram

‘या’ लोकांनी कॉफी पिऊच नका; कारण ऐकून थक्कच व्हाल

Photo Credit; instagram

भारतीयांमध्ये कॉफी लोकप्रिय पेय आहे. शरीर एनर्जेटिक राहण्यासाठी लोक कॉफी पितात. मात्र, काही लोकांसाठी कॉफीचं सेवन घातक ठरू शकतं.

Photo Credit; instagram

कॉफीमधील घटक रक्तदाब वाढण्याला कारणीभूत ठरू शकतात. यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे रक्तदाबाच्या रुग्णांनी कॉफी पिणं टाळलं पाहिजे.

Photo Credit; instagram

गर्भावस्थेत असताना कॉफीचं सेवन केल्याने बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गररोद महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कॉफी पिऊ नये.

Photo Credit; instagram

कॉफीमधील कॅफीन घटक झोपेच्या चक्रात बाधा आणू शकतो. यामुळे निद्रानाशची समस्या उद्भवू शकते. झोपेच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी कॉफीचं सेवन करू नये.

Photo Credit; instagram

कॅफीन शरीरामधील एड्रेनालाइन होर्मोन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं. यामुळे तणाव आणि अस्वस्था यासारख्या समस्या होऊ शकतात.

Photo Credit; instagram

कॉफी प्यायल्याने पोटामध्ये अॅसिडचं प्रमाण वाढू शकतं. यामुळे पोटात जळजळ, अॅसिडिटी आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.

Photo Credit; instagram

जास्त कॅफीनचं सेवन केल्याने मुलांच्या आणि तरुणांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांनी याचं सेवन करणं टाळलं पाहिजे.

पुढील वेब स्टोरी

योगा करण्याच्या आधी आणि नंतर ‘हे’ खा; मिळतील दुप्पट फायदे

इथे क्लिक करा