समजून जा... तुम्ही आता होणार जाडजूड, 'या' गोष्टी केल्या की कंबर सुटणारच!
Photo Credit; canva
लठ्ठपणा वाढल्यानंतर तो कमी करणं खूपच कठीण असतं. मात्र, वजन वाढण्याच्या सुरूवातीच्या लक्षणांकडे लक्ष दिलं तर लठ्ठपणा वाढण्याआधीच कमी केला जाऊ शकतो.
Photo Credit; canva
जशी कोणत्याही आजाराची लक्षणे शरीरात आधीच दिसू लागतात, तसंच वजन वाढण्यापूर्वीच शरीरात बरीच लक्षणे दिसू लागतात. अशा लक्षणांकडे बऱ्याचदा आपलं दुर्लक्ष होतं.
Photo Credit; canva
अशा काही लक्षणांबद्दल जाणून घ्या, ज्यांच्या साहाय्याने तुम्हाला तुमच्या शरीराचं वजन वाढल्याचं जाणवेल आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करू शकाल.
Photo Credit; canva
जेव्हा आपल्या शरीरात चरबी वाढू लागते तेव्हा ती सहसा आधी कंबरेभोवती दिसून येते. अशात जर तुम्हालाही तुमच्या कंबरेभोवती वजन वाढताना दिसले तर तुम्हाला वजन कमी करावे लागेल.
Photo Credit; canva
चांगली झोप आणि योग्य आहार घेतल्यानंतरही जर तुम्हाला दैनंदिन कामे करताना थकवा जाणवत असेल, तर हे वजन वाढल्याचे सुरुवातीचे लक्षण आहे.
Photo Credit; canva
जेव्हा मानेभोवती किंवा छातीभोवती चरबी वाढते तेव्हा श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे बरेच लोक रात्री घोरायला लागतात.
Photo Credit; canva
वजन वाढल्याने सांध्यांवर, विशेषतः गुडघे, कंबर आणि पाठीच्या खालच्या भागात जास्त दबाव येतो आणि यामुळेच बऱ्याचदा जास्त वेदना जाणवतात.
Photo Credit; canva
वजन वाढल्याने हार्मोनल असंतुलन होते, ज्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होते. अशात, जर तुम्हाला जेवल्यानंतरही खावेसे वाटत असेल, तर वजन कमी करायला सुरुवात करणे महत्वाचे आहे.
Photo Credit; canva
जर तुमच्या शरीरातही अशी लक्षणे दिसत असतील तर प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरेचे सेवन कमी करा आणि निरोगी आहार आणि व्यायामाला तुमच्या जीवनशैलीचा एक भाग बनवा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...