Photo Credit; instagram

तुम्हीसुद्धा जास्त गोड पदार्थ खाता? त्याऐवजी 'हे' 5 स्मार्टफूड्स नक्की ट्राय करा

Photo Credit; instagram

बऱ्याचजणांना खूप गोड पदार्थ खायला आवडतात. विशेषत: संध्याकाळच्या वेळी किंवा जेवल्यानंतर अनेकजण आवर्जून स्वीट डिश घेतात.

Photo Credit; instagram

गोड खाण्याची क्रेव्हिंग्स होणे, अगदी सामान्य आहे. पण, अधिक प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला नुकसान पोहचू शकतं.

Photo Credit; instagram

जापानच्या आहारतज्ज्ञांनी गोड खाण्याच्या क्रेव्हिंग्स थांबवण्यासाठी काही हेल्दी पदार्थांचे पर्याय सांगितले आहेत.

Photo Credit; instagram

अशा 5 हेल्दी पदार्थांविषयी जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळे गोड असून त्यात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. याच्या सेवनाने पोट अधिक काळ भरलेलं वाटतं आणि ब्लड शूगरची पातळी नियंत्रणात राहते.

Photo Credit; instagram

दररोज 1 ते 2 गोड खजूर खाल्ल्याने शरीरात फायबर्सची कमतरता राहत नाही आणि शरीरात दिवसभर एनर्जी राहते.

Photo Credit; instagram

बेरीजमध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्त्वं आढळतात. हे गोड असून यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारे अँटीऑक्सीडेंट्स आढळतात. दही किंवा स्मूदीमध्ये मिसळून यांचं सेवन करु शकता.

Photo Credit; instagram

ग्रीक योगर्ट हे घट्ट दही असून यामध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात आढळते. साखर नसलेलं हे दही खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं.

Photo Credit; instagram

चॉकलेट्स खाण्याची इच्छा झाल्यास डार्क चॉकलेट्सचं सेवन करा. यामध्ये कमी प्रमाणात साखर असून हृदयाच्या स्वास्थ्यासाठी फायद्याचं असल्याचं सांगितलं जातं. 

पुढील वेब स्टोरी

कधीही चहा पिणं पडेल महागात.... काय होतील परिणाम?

इथे क्लिक करा