वजन कमी करण्यासाठी डिनरकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं असतं. रात्रीचं जेवण हे हल्कं, पौष्टिक आणि सोप्यारितीने पचणारं असायला हवं.
Photo Credit; instagram
अशातच, हेल्दी सूप वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. सूपमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगला पर्याय आहे.
Photo Credit; instagram
सूपमध्ये भाज्या आणि डाळींचा समावेश असतो. यामुळे शरीराला फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. डिनरमध्ये सूप घेतल्याने वेटलॉससाठी चांगला फायदा मिळतो.
Photo Credit; instagram
आलं आणि लसूण हल्कं भाजून त्यात चिरलेल्या हिरव्या भाज्या टाका. यामध्ये पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक घालून भाज्या मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. यावर मीठ आणि काळी मिरी घालून सर्व्ह करा.
Photo Credit; instagram
टोमॅटो, कांदा आणि लसूण पाण्यात उकडून घेऊन ते ब्लेंड करा. आता ही पेस्ट पाण्यात किंवा स्टॉकमध्ये मिसळा. यानंतर, त्यात मीठ, काळी मिरी आणि हर्ब्स टाकून 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्या. हे सूप फॅट बर्निंगसाठी उपयुक्त ठरेल.
Photo Credit; instagram
मुगाची डाळ आणि चिरलेल्या भाज्या प्रेशर कुकरमध्ये हळद, मीठ आणि काळ्या मिरीसोबत शिजवून घ्या. दाल आणि भाज्या चांगल्याप्रकारे शिजल्यावर तुमचं सूप तयार आहे. हे सूप फायबरयुक्त असून वेट लॉससाठी उत्तम मानलं गेलं आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
किडनी स्टोन झालाय? मग 'हा' पदार्थ चुकूनही खाऊ नका, नाहीतर...