Photo Credit; instagram

मांड्यांची चरबी गंभीर आजाराचं लक्षण? जाणून घ्या, तज्ज्ञांचं मत

Photo Credit; instagram

जवळपास प्रत्येकालाच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हावी, असं वाटत असतं. लठ्ठपणामुळे काही गंभीर आजारसुद्धा जडू शकतात.

Photo Credit; instagram

शरीरातील फॅट हे सामान्य आहे की लिपेडेमा? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. खरंतर लिपेडेमा विशेषत: लॉअर बॉडी आणि हातांमध्ये दिसून येतं.

Photo Credit; instagram

डॉक्टरांच्या मते, लिपेडेमा फॅट शरीरातील समान्य चरबीपेक्षा खूप वेगळं असतं. लिपेडेमा फॅट बऱ्याचदा पाय, हात आणि मांड्यांमध्ये पाहायला मिळतं.

Photo Credit; instagram

लिपेडेमा फॅटवर डाएट आणि व्यायाम केल्याने काहीच फरक होत नाही. हे फॅट वेदनेसोबत बऱ्याच शारीरिक समस्यांना कारणीभूत ठरू शकतं. जगातील जवळपास 11 टक्के महिला लिपेडेमाने ग्रस्त असल्याचं समोर आलं आहे.

Photo Credit; instagram

डॉक्टरांच्या मते, लिपेडेमा फॅटने ग्रस्त असलेल्या लोकांना वजन कमी करणं मोठं आव्हान असतं. अधिक वजन वाढल्याकारणाने स्ट्रेस सुद्धा वाढतो.

Photo Credit; instagram

लिपेडेमा चरबी कंबर, मांड्या आणि पायांपर्यंत पसरते. जसजशी ही स्थिती वाढत जाते तसतसी चरबी वाढते आणि या आजाराने ग्रस्त रुग्णाचे खालचे शरीर जड होते.

Photo Credit; instagram

लिपेडेमा फॅट सेल्स लिम्फॅटिक सिस्टिमच्या रक्तवाहिन्यांना ब्लॉक करतात, जे सामान्यतः शरीरातील द्रव म्हणजेच लिक्विड पातळी संतुलित करण्यास आणि संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

लिपेडेमा फॅटपासून सुटका मिळवण्यासाठी तज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला दाहक-विरोधी आहार, हायड्रेशन, अॅक्टिव्हिटीज आणि इतर गोष्टींसाठी मदत मिळेल.

Photo Credit; instagram

महिलांचे हॉर्मोन्स या आजाराला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. हे बऱ्याचदा तारुण्यवस्थेत, गर्भधारणेदरम्यान, स्त्रीरोग शस्त्रक्रियेनंतर आणि प्यूबर्टी वेळी सुरू होते.

Photo Credit; instagram

या स्थितीसाठी संपूर्ण डीकंजेस्टिव्ह थेरपी नावाचा उपचार घेण्याची शिफारस केली जाते. त्यात मॅन्युअल लिम्फॅटिक ड्रेनेज, व्यायाम, लिपोसक्शन यांचा समावेश आहे.

पुढील वेब स्टोरी

तुमच्या घरात पैशांचा पाऊस... फक्त 'या' लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष

इथे क्लिक करा