तुमच्या घरात पैशांचा पाऊस... फक्त 'या' लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
Photo Credit; instagram
हिंदू धर्मात, माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते. व्यक्तीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्याला आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नसल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
त्यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक बरेच उपाय करतात. वास्तुशास्त्रानुसार, माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्याआधी तुम्हाला काही शुभ संकेत मिळतात.
Photo Credit; instagram
तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे असे कोणते संकेत पाहायला मिळतात? जाणून घ्या.
Photo Credit; instagram
वास्तुशास्त्रानुसार, घरात अचानक अधिक प्रमाणात काळ्या मुंग्या दिसल्या तर तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्याचं सांगितलं जातं. हे घरातील दारिद्र्य दूर होणार असल्याचं देखील संकेत आहे.
Photo Credit; instagram
शास्त्रानुसार, जर तुमच्या उजव्या हाताच्या तळव्यावर सतत खाज येत असेल तर लवकच धनलाभ होऊ शकतो.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला स्वप्नात झाडू, हत्ती, मुंगूस, शंख, सरडा, तारा, साप किंवा गुलाब दिसला तर तुम्हाला आर्थिक समस्यांपासून सुटका मिळू शकते. हे आर्थिक लाभाचे लक्षण असल्याचं मानलं जातं.
Photo Credit; instagram
तसेच सकाळी उठल्यानंतर कुठूनही शंखाचा आवाज ऐकू येणं देखील आर्थिक समस्या दूर होण्याच्या दृष्टीने शुभ संकेत मानलं जातं. शंखाशी देवी लक्ष्मीचा संबंध असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
शास्त्रात गाय वासराला दूध पाजताना पाहणे आर्थिक लाभाचं लक्षण मानलं जाते. वासरू हे प्रगती आणि उन्नतीचे प्रतीक आहे, म्हणून गाय वासराला दूध पाजताना पाहणे देखील प्रगतीचे लक्षण असू शकते.