Photo Credit; instagram

लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!

Photo Credit; instagram

आजकाल वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असल्याचं पाहायला मिळतं.

Photo Credit; instagram

वेट लॉससाठी साखर कमी करणे, डाएटिंग आणि एक्सरसाइझ करणं सर्वांनाच माहित आहेत. मात्र, एका न्यूट्रिशनिस्टने चक्क मुलांकडून इंस्पायर्ड होऊन एक ट्रिक सांगितली आहे.

Photo Credit; instagram

वेट लॉससाठी फायदेशीर असलेली लहान मुलांची अशी कोणती सवय आहे? सविस्तर जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

लहान मुलं कधीच जास्त खात नाहीत. भूक लागल्यावर ते रडतात आणि पोट भरताच खाणं थांबवतात. जेवण कितीही चविष्ट असले तरी पोट भरताच ते खाणं थांबवतात.

Photo Credit; instagram

आहारतज्ज्ञांच्या मते, लहान बाळांची ही साधी सवय तुमचे वजन कमी करण्याचे सीक्रेट ठरू शकते.

Photo Credit; instagram

आहारतज्ज्ञांनी बाळांच्या या सवयीला Intuitive Eating म्हटलं आहे. मुलं भूक लागल्यावरच खातात आणि पोट भरल्यावर खाणं थांबवतात.

Photo Credit; instagram

ते फक्त जेवायचं आहे म्हणून जेवत नाहीत किंवा कंटाळा आला म्हणून खाणं थांबवत नाहीत. मोठे व्यक्ती देखील ही सवय आत्मसात करणं शिकू शकतात.

Photo Credit; instagram

बरेच लोक भूकेशिवाय इतर कारणांसाठी खातात, जसे की ताण, भावना किंवा सवय. जास्त खाण्यामुळे वजन वाढते. परंतु भूक लागल्यावरच खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

जेव्हा तुम्हाला खरोखर भूक लागते तेव्हा खा. पोट भरल्यावर खाणे थांबवा. जेवताना लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी (जसे की मोबाईल किंवा टीव्ही) टाळा.

Photo Credit; instagram

पोषणतज्ज्ञांच्या मते, बाळांसारखी ही सवय अंगीकारल्यास वजन जलद गतीने कमी होण्यास मदत होते.

पुढील वेब स्टोरी

50 वयातही त्वचा राहील टाइट... फक्त 'हे' उपाय करा!

इथे क्लिक करा