मॉर्निंग वॉकची 'ही' आहे योग्य वेळ; फ्रेश हवा तर मिळेलंच पण त्यासोबत...
Photo Credit; instagram
मॉर्निंग वॉक आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. सकाळी तुमच्या वॉकची वेळसुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते. यामुळे तुमच्या आरोग्यावर बरेच परिणाम होतात.
Photo Credit; instagram
सकाळच्या ताज्या हवेत साधा फेरफटका जरी मारला तरी त्याचे शारिरीक आणि मानसिक बरेच फायदे मिळतात. अशात, तुम्हाला मॉर्निंग वॉकची योग्य वेळ माहितीये?
Photo Credit; instagram
सकाळच्या कोवळ्या उन्हात वॉक केल्याने शरीराला आवश्यक असलेलं व्हिटॅमिन D मिळते. हे हाडांसाठी खूपच फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.
Photo Credit; instagram
मॉर्निंग वॉकसाठी सकाळी 6:30 च्या आधीची वेळ लाभदायक असल्याचं मानलं जातं. यावेळी तापमान देखील थंड असतं.
Photo Credit; instagram
तसेच, सकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत कोणत्याही वेळेत वॉक केल्याने तुमच्या शरीराला सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश मिळतो.
Photo Credit; instagram
जे व्यक्ती सकाळी कामात व्यस्त असतात, ते लोक सकाळी 8:00 ते 10:00 वाजेपर्यंत मोकळ्या हवेत फेरफटका मारु शकतात. यादरम्यान सकाळी नाश्ता झाल्यानंतर वॉक केल्याने पचनक्रियेत सुधारणा होते.
Photo Credit; instagram
मात्र, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हिवाळ्यात मॉर्निंग वॉक करणं टाळलं पाहिजे. अशा लोकांसाठी सकाळी 8:00 नंतर वॉक करणे फायदेशीर आहे कारण सूर्याची उष्णता रक्तदाब चांगल्या प्रकारे नियंत्रित करते.
Photo Credit; instagram
मधुमेही रुग्णांना मॉर्निंग वॉकचा चांगलाच फायदा होऊ शकतो. कारण, मॉर्निंग वॉक हा रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्याचा एक चांगला मार्ग आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
133 किलो वजन असणारी तरुणी दिसायला लागली खूपच Hot, हे जमलं तरी कसं?