Photo Credit; canva

सकाळी उठण्यासाठी लावता अलार्म ? होऊ शकतो खतरनाक आजार

Photo Credit; canva

रात्री झोपण्याच्या आधी सकाळी वेळेवर उठण्यासाठी अलार्म लावणं ही अनेकांची सवय असते. मात्र तुमची नेहमीची ही सवय तुमच्या हृदयाच्या स्वास्थ्यासाठी धोक्याची ठरू शकते.

Photo Credit; canva

अलार्म वाजल्यावर अचानक उठल्याने तुमच्या हृदयावर आणि रक्तदाबावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Photo Credit; canva

जेव्हा अलार्म वाजतो तेव्हा तुमचं नैसर्गित झोपेचं चक्र डिस्टर्ब होऊ शकतं. आपलं शरीर हे एक सर्कॅडियन रिदम फॉलो करतं.

Photo Credit; canva

हे रिदम एका प्रकारचं 24 तासांचं घड्याळ असतं जे झोपण्याच्या आणि जागण्याच्या पॅटर्नसोबत बऱ्याच प्रकारच्या शारिरीक प्रक्रिया नियंत्रणात ठेवतं. हे रिदम सूर्योदय आणि सूर्यास्ताशी जोडलेलं असतं.

Photo Credit; canva

गाढ झोपेत असताना अचानक अलार्म वाजल्याने हृदयावर दबाव पडू शकतो. कारण, अशावेळी तुमचं शरीर अचानक गाढ झोपेतून उठून जागरुक होण्याचा प्रयत्न करतं.

Photo Credit; canva

मोठ्या आवाजात अलार्म वाजल्याने शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढू लागतात. त्यामुळे शरीरात अचानक स्ट्रेस हार्मोन्स वाढल्याने ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट वाढू लागतो.

Photo Credit; canva

सकाळी उठण्यासाठी अलार्म लावल्यामुळे तुमच्या मानसिक स्वास्थ्यासोबत तुमच्या मूडवर सुद्धा विपरित परिणाम होऊ शकतो. मूड आणि भावना नियंत्रणात राहण्यासाठी झोप महत्त्वाची भूमिका बजावते.

Photo Credit; canva

जेव्हा अर्लाममुळे तुमची झोप उडते, तेव्हा तुम्हाला चिडचिड आणि तणावाचा सामना करावा लागू शकतो.

Photo Credit; canva

त्यामुळे अलार्म न लावता अगदी वेळेवर उठण्यासाठी चांगली लाइफस्टाइल आणि स्लीप पॅटर्न गरजेचं आहे. यासाठी रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित करा.

Photo Credit; canva

रात्री झोपण्याच्या आधी कोमट पाण्याने अंघोळ करा, पुस्तक वाचा आणि मोबाईल फोनपासून दूर राहा. असं केल्याने तुम्हाला लवकर आणि चांगली झोप लागेल. 7 ते 9 तास झोप घेणं शरीरासाठी आवश्यक आहे.

Photo Credit; canva

सकाळचा नैसर्गिक कोवळा प्रकाश तुमच्या शरीराचं सर्कॅडियन रिदम रेगुलेट करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर सर्वात आधी खिडकी आणि पडदे बाजूला करा आणि बाहेरील प्रकाश खोलीच्या आत येऊ द्या.

पुढील वेब स्टोरी

सुटलेल्या पोटामुळे लाज वाटते? फक्त 'या' पदार्थांचं करा सेवन, झटपट व्हाल सडपातळ

इथे क्लिक करा